Federal Employees Threat : गेल्या आठवड्यातील कामगिरीची माहिती द्या, अन्यथा राजीनामा द्या, असा इमेल अमेरिकेतील सरकारी कर्मचाऱ्यांना येऊ लागले आहेत. यासंदर्भातल एलॉन मस्क यांनी आधीच इशाराही दिला होता. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ आणि संताप निर्माण झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ऑफिस ऑफ कार्मिक मॅनेजमेंटकडून हे इमेल सरकारी कर्मचाऱ्यांनी गेले आहेत. तुम्ही गेल्या आठवड्यात काय केलं? यासंदर्भात उत्तर द्या. सोमवारी ११.५९ पर्यंत याचं उत्तर देण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. दरम्यान, सरकारी कर्मचारी कपातीची योजना डोनाल्ड ट्रम्प यांनी आखली असून ही योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एलॉन मस्क कार्यरत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आलेल्या हे ईमेलमुळे त्यांच्या भीतीचं वातावरण पसरलं आहे.

ओपीएमच्या प्रवक्त्या मॅकलॉरिन पिनोव्हर यांनी जारी केलेल्या निवेदनात, “ट्रम्प प्रशासनाच्या कार्यक्षम आणि जबाबदार संघीय कार्यबलासाठी वचनबद्धतेचा भाग म्हणून ही विनंती करण्यात आली आहे. पिनोव्हरने सांगितले की एजन्सी व्यवस्थापक कर्मचाऱ्यांच्या प्रतिसादांचे पुनरावलोकन केल्यानंतर पुढील पावले निश्चित करतील.

ईमेलमुळे कर्मचाऱ्यांच्या कामाप्रती असलेली सुरक्षितता धोक्यात आली आहे. संरक्षण किंवा तत्सम विभागात काम करणाऱे कर्मचारी परवानगीशिवाय त्यांच्या कामाची माहिती उघड करू शकत नाहीत. तसंच, दूरस्थ ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना इमेलचा फारसा वापर करता येत नाही. तसंच, मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचारी सुट्टीवर असल्याने ते सरकारी उपकरणे आणि इमेल वापरू शकत नाहीत.

कर्मचारी मानसिक दडपणाखाली

गेल्या काही दिवसांत प्रोबशनरी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे दररोज नोकरीवरून काढून टाकण्याच्या भीतीने अनेक कर्मचारी दडपणाखाली आहेत. “मला माहीत नाही की आपण या मानसिक दहशतीचा सामना कसा करणार आहोत”, असं राष्ट्रीय महासागरी आणि वातावरणीय प्रशासनाताली एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून वॉशिंग्टन पोस्टला प्रतिक्रिया दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनमधील एका कर्मचाऱ्याने वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसशी बोलताना अशाच भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “माझ्यासाठी, हे असे म्हणण्यासारखे आहे की, या आठवड्यात तुम्ही कोणती घरातील कामे केली, हे सांगा नाहीतर मी शनिवारी तुमचं घर जाळून टाकीन.”