अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) चीनने जर अतिक्रमण केलं तर आम्ही त्याचा निषेध नोंदवू असंही अमेरिकेने म्हटलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले की अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य घटक आहे, हे आम्ही मान्य केलं आहे. कुणीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अतिक्रमण केलं तर आम्ही विरोधच करु.

मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरूणाचल प्रदेशाचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी तवांग येथील सेला टनेलचं उद्घाटन केलं होतं. रणनीतीच्या दृष्टीने हे मोठं पाऊल मानलं गेलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अरूणाचल प्रदेशाच्या दौऱ्यानंतर चीनने हे पोकळ दावे केले की अरूणाचल प्रदेश हा आमचाच आहे. चीनच्या पराराष्ट्र प्रवक्त्यांनी तर असंही म्हटलं होतं की जिजांग चा दक्षिणी भाग ज्याला आम्ही तिबेट हे नाव दिलं आहे तो संपूर्ण भूभाग चीनचा आहे. भारताने याचा विरोध केला आणि निषेध नोंदवला होता. आता अमेरिकेनेच चीनला खडे बोल सुनावत अरूणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे असं म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चीनने जेव्हा अरूणाचल प्रदेशावर दावा सांगितला तेव्हा भारताच्या परराष्ट्र प्रवक्त्यांनी तो दावा खोडून काढला. चीन पोकळ दावे करतो आहे त्या दाव्यांना काही अर्थ नाही. अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य हिस्सा होता, आहे आणि राहिल असं भारताने म्हटलं होतं.