उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी (११ नोव्हेंबर) राज्यातील विविध भागातून ISIS च्या सहा संशयितांना अटक केली आहे. रकीब इनाम, नावेद सिद्दीकी, मोहम्मद नोमान आणि मोहम्मद नाझीम अशी या सहापैकी चौघांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी अलिगढ विद्यापीठाच्या स्टुडंट्स ऑफ अलिगढ युनिव्हर्सिटी (एसएएमयू) या विद्यार्थी संघटनेशी संबंधित आहेत. ते सर्वजण एसएएमयू बैठकीद्वारे एकमेकांना ओळखत होते.

उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित संशयित आरोपी देशात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची योजना आखत होते. यूपी एटीएसने सहा जणांना अटक केल्याने अलीगढ विद्यापीठात खळबळ उडाली आहे. SAMU ही ISIS मध्ये नवीन लोकांची भरती करणारी शाखा बनली आहे, असा दावाही दहशतवादविरोधी पथकाने केला. तसेच अलीगढ विद्यापीठातील इतर काही विद्यार्थीही केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत, असं वृत्त ‘इंडिया टुडे’नं सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.

हेही वाचा- संयुक्त राष्ट्रसंघात भारताची इस्रायलविरोधात भूमिका, नेमकं प्रकरण काय?…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) काही दिवसांपूर्वी पुण्यातून इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) मॉड्यूल प्रकरणात रिझवान आणि शाहनवाज यांना अटक केली होती. संबंधितांची चौकशी केली असता अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील अनेक विद्यार्थी सोशल मीडियातून देशविरोधी अजेंडा राबवण्यात गुंतल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे यूपी एटीएसने आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. सर्व संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.