Uttarakhand Tunnel Crash News in Marathi : उत्तराखंडमधील ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारा ते डंडालगाव दरम्यानच्या बांधकामाधीन बोगद्याचा भाग रविवारी सकाळी कोसळला. त्याखाली ४० कामगार अडकले असून बचावकार्य युद्धपातळीवर चालू आहे. अडकलेल्या ४० कामगारांशी संपर्क झाला असून ते सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यासाठी पुरवठा पाईपमधून अन्न, पाणी पुरवलं जात असून ऑक्सिजनचाही पुरवठा केला जात आहे. दरम्यान, बचावकार्य १५ मीटर पोहोचलं असून अद्याप ३५ मीटरचं काम शिल्लक असल्याची माहिती उत्तरकाशीचे मंडळ अधिकारी प्रशांत कुमार यांनी दिली.

रविवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारा ते डंडालगाव दरम्यानच्या बांधकामाधीन बोगद्यात ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी शोध आणि बचाव कार्य सुरू केले. अडकलेल्या कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून बोगद्याच्या कोसळलेल्या भागात प्राणवायू नलिका टाकण्यात आल्या आहेत. तसेच कामगारांपर्यंत अन्नपदार्थही पाठवले जात आहेत. बोगद्याच्या वरील बाजूचा सुमारे ५०-६० मीटर भाग कोसळला असून तो बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून सुमारे २०० मीटर अंतरावर आहे.

pune, Gang Vandalized Vehicles, Bibwewadi, Gang Vandalized Vehicles in Bibwewadi, koyta, unleashed terror, pune Gang Vandalized Vehicles, crime news, pune police, marathi news, crime in pune,
पुण्यात गोळीबाराच्या घटनांनंतर आता कोयता गँगचा राडा सुरू
mumbai, Sea Coast Road,
मुंबई : सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू जोडणीच्या कामाला वेग, अखेर तुळई वरळीत दाखल
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
heat Caution warning of health department in the background of heat stroke mumbai
तापत्या राजकीय वातावरणात उष्माघाताचा फटका; उष्मघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा सावधतेचा इशारा!

एनडीआरएफ आणि एसडीआरएफ बचाव पथकांतील सुमारे १६० जवान विविध साधनांच्या सहाय्याने अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती उत्तरकाशी जिल्हा आपत्कालीन केंद्राने दिली. कमांडिंग ऑफिसर नमन नरुला आणि सहायक कमांडंट जाधव वैभव यांच्या नेतृत्वाखालील ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ आणि ‘इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस’ (आयटीबीपी) पथकेही बचावकार्यात सहभागी झाली आहेत. दुर्घटना कशी घडली आणि याला जबाबदार कोण यापेक्षाही सध्या आम्ही अडकलेल्या कामगारांचा जीव वाचवण्यास प्राधान्य देत आहोत, असे उत्तरकाशीच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

निर्माणाधीन बोगद्यात अडकलेल्या ४० कामगारांच्या बचावकार्यासाठी गेल्या २४ हून अधिक तासांपासून बचावकार्य चालू आहे. तसंच, सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना अन्न, पाणी आणि ऑक्सिजनचा पुरवठा सातत्याने केला जात आहे. लवकरात लवकर त्यांना बाहेर काढलं जाईल, अशी माहिती उत्तरकाशीचे जिल्हा आपत्तीव्यवस्थापक अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी दिली.