उत्तराखंडमधील हलद्वानी जिल्ह्यातील बनभुलपुरा भागात मलिक बागेजवळ एका अनधिकृत मदरशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांवर, पोलिसांवर आणि या घटनेचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी (८ फेब्रुवारी) रात्री घडली. दरम्यान, पोलीस बंदोबस्तात अनधिकृत मदरसा जमीनदोस्त करण्यात आला. त्यानंतर जमाव आणखी आक्रमक झाला. या जमावाने पोलीस, महापालिका आणि प्रसारमाध्यमांच्या गाड्या पेटवल्या. जमावाकडून दगडफेक सुरू असताना त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अ्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तरीदेखील जमावाकडून दगडफेक आणि जाळपोळ सुरूच होती. अखेर पोलिसांना अधिक बळाचा वापर करावा लागला. परंतु, तोवर बनभुलपुरा भागात मोठा हिंसाचार उसळला. या घटनेला २० तास उलटले तरी बनभुलपुरा भागात हिंसाचार चालू आहे. अशातच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी बनभुलपुरा भागात संचारबंदी लागू केली आहे. या भागात अधिक पोलीस कुमक बोलावण्यात आली आहे. तरीदेखील काही ठिकाणी हिंसाचार चालू आहे. दरम्यान, दगडफेकीच्या घटनेत शहर दंडाधिकारी ऋचा सिंह, रामनगरच्या कोतवालांसह २५० हून अधिक पोलीस, शासकीय अधिकारी आणि पत्रकार जखमी झाले आहेत. समाजकंटकांनी बनभुलपुरा पोलीस ठाण्याला आग लावली आहे. दंगलखोरांनी पोलिसांची वाहनं, जेसीबी आणि अग्निशमन दलाची वाहनंदेखील पेटवली आहेत. आतापर्यंत या दंगलीत ६० हून अधिक वाहनं जाळली गेली आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, लाठीचार्ज केला, हवेत गोळीबार केला तरीदेखील ही दंगल थांबलेली नाही.

MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर

जमावाने हल्ल्या केल्यानंतर सर्वप्रथम शासकीय अधिकाऱ्यांनी तिथून पळून काढला. त्यापाठोपाठ पोलिसांनी महापालिका अधिकाऱ्यांना तिथून बाहेर काढलं. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. तसेच जमाव नियंत्रणात येत नाही हे लक्षात आल्यावर अधिक पोलीस कुमक मागवण्यात आली. आतापर्यंत या दंगलीत पिता-पुत्रासह सहा जणांचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक पोलीस, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार आणि सामान्य नागरिक जखमी झाले आहेत.

बनभुलपुरा पोलीस ठाण्याजवळील मलिक बागेजवळ एक अनधिकृत मदरसा बांधण्यात आला होता. या परिसरात गुरुवारी (८ फेब्रुवारी) सायंकाळी नमाज पठणाच्या वेळी नेहमीपेक्षा अधिक लोक जमले होते. तसेच परिसरात गोंधळ सुरू होता. दरम्यान, महापालिकेचं पथक जेसीबी घेऊन हा मदरसा पाडण्यासाठी मलिक बागेजवळ दाखल झालं. या जमावाला आधीच माहिती मिळाली होती की पालिका हा मदरसा पाडणार आहे. पालिकेचे कर्मचारी आणि पोलीस मलिक बागेजवल पोहोचताच समाजकंटकांनी महापालिकेचे अधिकारी, पोलीस आणि पत्रकारांवर दगडफेक सुरू केली. पाठोपाठ या जमावाने सरकारी वाहनं पेटवण्यास सुरुवात केली. रात्रीपासूनच या भागात मोठी दंगल उसळली आहे. त्यामुळे देवभूमी अशांत आहे.

जमावाने पोलीस ठाणं पेटवलं

जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याचवेळी शेकडो लोकांनी घरांच्या छतावरून पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना ही दंगल नियंत्रणात आणता आली नाही. पोलीस वसतीमध्ये येऊ नयेत यासाठी प्रत्येक गल्लीच्या तोंडावर जमावाने टायर्स जाळले. तसेच काही पेटते टायर्स पोलिसांच्या दिशेने भिरकावले. तसेच जमवाने बनभुलपुरा पोलीस ठाणंदेखील पेटवलं आहे.