माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एम्स रुग्णालयात दाखल

नेहमीच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांनारुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्या प्रकृतीची तपासणी सुरु आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सोमवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, नेहमीच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्या प्रकृतीची तपासणी सुरु आहे. रात्री ८ वाजता तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी माहिती सुत्रांकडून कळते. याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे बऱ्याच काळापासून आजारी आहेत. भाजपाच्या संस्थापकांपैकी एक असणारे वाजपेयी ३ वेळा पंतप्रधान राहिले आहेत. ते पहिले असे बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत, ज्यांनी आपला पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने गौरविण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vajpayee admitted to aiims for routine check up