राष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहिल्यामुळे एका कुटुंबाला चित्रपटगृहातील इतर प्रेक्षकांनी थेट बाहेरचा रस्ता दाखवला. बंगळुरूच्या मल्लेश्वरम ओरियन मॉलमधील पीव्हीआर थिएटरमध्ये हा प्रकार घडला. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा प्रकार घडला त्यावेळी दोन कन्नड कलाकार देखील चित्रपटगृहात उपस्थित होते.
कन्नड अभिनेत्री, बी.व्ही. ऐश्वर्या हिने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला होता. नंतर तो व्हिडिओ तिने डिलिट केला, पण तोपर्यंत हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. २३ ऑक्टोबर रोजीची ही घटना असल्याचं सांगितलं जात असून व्हिडिओत प्रेक्षकांची त्या कुटुंबासोबत झालेली बाचाबाची दिसत आहे. प्रेक्षकांनी त्या कुटुंबीयांना राष्ट्रगीतासाठी उभं राहण्यास सांगितलं असता, ‘हा एक सिनेमा आहे. उभं राहावं की नाही हा आमचा निर्णय आहे. तुम्हाला काही त्रास असेल तर पोलिस स्थानकात तक्रार करा’, असं त्या कुटुंबीयांनी सांगितलं. त्यामुळे इतर प्रेक्षक संतापले आणि वादाला सुरूवात झाली. काही लोकांनी राष्ट्रगीताचा आदर केला नाही म्हणून मारहाण करण्याचा प्रयत्न देखील केला, तर शिवीगाळ देखील झाली. त्यानंतर, ‘हे स्वत:ला भारतीय नागरिक म्हणवणारे, साधं राष्ट्रगीत सुरु असताना उभं राहण्याचीही तसदी घेत नाहीत…भारतीय भूमीवर उभे आहात, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही पाकिस्तानी दहशतवादी आहात का?’ अशा शब्दात तेथील प्रेक्षकांनी त्या कुटुंबीयांची कानउघाडणी केली. अखेर संतप्त प्रेक्षकांच्या जमावाने त्यांना चित्रपटगृहातून थेट बाहेरचा रस्ता दाखवला. या व्हिडिओत कन्नड अभिनेता अरुण गौड़ा हा दिसत असून तेथे घडलेला प्रसंग तो सांगतोय.
पाहा व्हिडिओ –
ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆಗೆ ಗೌರವ ಕೊಡದ ಬೇವರ್ಸಿಗಳು..!
ನಮ್ಮ ದೇಶದ ಅನ್ನ ತಿಂದು, ರಾಷ್ಟ್ರ ಗೀತೆ ಹಾಡುವಾಗ ಅಗೌರವ ಸಲ್ಲಿಸುವವರಿಗೆ ಮೆಟ್ಟಲ್ಲಿ ಹೊಡೀಬೇಕು. pic.twitter.com/cQlaUIIq2x
— ಅಕ್ಷಯ್ अक्षय Akki (@AkshayVandure1) October 25, 2019
दरम्यान, या घटनेबाबत अद्याप पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही. अभिनेता धनुषची भूमिका असणाऱ्या ‘असूरन’ चित्रपटावेळी हा प्रकार घडला.