मॉस्को कोर्टाने सोमवारी क्रेमलिनच्या (रशियन सरकार) एका मोठ्या विरोधकाला देशद्रोह आणि रशियन सैन्याची बदनामी केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवलं आहे. तसेच त्याला २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. व्लादिमीर कारा-मुर्झा ज्युनियर असं या नेत्याचं नावं आहे. व्लादिमिर कारा-मुर्झा हे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक आणि चित्रपट निर्माते देखील आहेत.

व्लादिमीर कारा-मुर्झा ज्युनियर हे दोन वेळा विषबाधा होऊन वाचले आहेत. यासाठी त्यांनी रशियन सरकारला जबाबदार धरलं आहे. वर्षभरापूर्वी त्यांना अटक करण्यात आलं होतं. तेव्हापासून ते तुरुंगात आहे. त्यांनी त्यांच्यावरील आरोप राजकीय असल्याचे सांगून फेटाळून लावले आणि त्यांच्यावर होत असलेल्या कारवाईची तुलना हुकूमशहा जोसेफ स्टॅलिनच्या राजवटीत झालेल्या अत्याचारांशी केली आहे.

कारा-मुर्झा यांनी १५ मार्च रोजी एरिझोना हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये एक भाषण केलं होतं. या भाषणात त्यावेळी त्यांनी रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध केला होता. या भाषणानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. ते तुरुंगात असताना त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावले. रशियाने गेल्या वर्षी २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनमध्ये सैन्य पाठवलं आणि लगेचच त्याच्या सैन्याविषयी ‘खोटी माहिती’ पसरवण्याला गुन्हेगार ठरवणारा कायदा लागू केला होता. या कायद्याअंतर्गत कारा-मुर्झा यांना गुन्हेगार ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

हे ही वाचा >> Atiq Ahmed Killed : “दोन आठवड्यात मला मारून टाकतील”, अशरफने केलेली हत्येची भविष्यवाणी, म्हणालेला, “मी बंद पाकिट…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रशियन सरकारने युक्रेनवरील कारवाईला “विशेष लष्करी अभियान” म्हटलं आहे आणि त्यांच्या सरकारने या कारवाईवरील टीका रोखण्यासाठी कायद्याचा वापर केला आहे. ४१ वर्षीय कारा-मुर्झा हे पत्रकारही आहेत. त्यांच्याकडे रशियन आणि ब्रिटीश पासपोर्ट आहेत.