मागच्या वर्षी सुरु झालेल्या युक्रेन विरुद्ध रशिया युद्धाला काल (२० फेब्रुवारी) एक वर्ष पूर्ण झाले. या युद्धाची घोषणा केल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन खूप चर्चेत आले होते. या निर्णयामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. युद्ध सुरु केल्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम झाला होता. अशा कठीण परिस्थितीमध्येही पुतिन खंबीरपणे देशाचे नेतृत्त्व करत होते. गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली होती. आज युद्धाच्या वर्षपूर्ती निमित्त ते रशियाला संबोधणार आहेत. त्यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला जाणार आहे अशी शक्यता वर्तवली जात होती.

एसव्हीआर या रशियन टेलीग्राम चॅनलच्या आधारे द मिररने पुतिन यांच्या आरोग्यासंबंधित माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष कॅन्सरसह अनेक आजारांनी पीडित आहेत. त्यांच्यावर खासगी पद्धतीने उपचार सुरु असल्याने अनेक नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आले होते. मागच्या आठवड्यामध्ये त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या नव्या चाचणीच्या आधारे त्यांच्यावर होणाऱ्या उपचारांमध्ये नव्या पद्धतीचा वापर केला जाणार आहे. ५ मार्च पासून हे उपचार सुरु होणार आहेत.

पुतिन यांच्या आजारपणाचा प्रभाव युक्रेन-रशिया युद्धावर होणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. २०२३ च्या सुरुवातीला रशियाच्या युद्धनीतीमध्ये बदल करणार होते. आजच्या सभेमध्ये ते युद्धासंबंधित घोषणा करणार आहेत असे म्हटले जात आहे. त्यांच्या या सभेचे लाइव्ह प्रसारण करण्यात येत आहे. लाइव्ह भाषणामध्ये त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळाले. भाषणामध्ये त्यांनी युद्धासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच अमेरिकचे अध्यक्ष जो बायडन यांच्यावर जोरदार टीका केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रशिया आणि चीन यांचे चांगले संबंध असल्याने वर्षभरापासून सुरु असलेल्या युद्धामध्ये चीन रशियाची विनाशकारी हत्यारे देऊन मदत करु शकतो. युक्रेनच्या विरोधामध्ये रशियाने या शस्त्रांचा वापर केला तर तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होऊ शकते अशी चिंता व्यक्त केली जात आहे, असे घडू नये यासाठी सर्व देशांकडून प्रयत्न केले जात आहेत.