Vladimir Putin on Russia birth rate: रशियाचा जन्म दर घसरत असून घटत्या लोकसंख्येची चिंता राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना सतावू लागली आहे. लोकसंख्या वाढीसाठी पुतिन यांनी एक अजब फर्मान सोडले आहे. मेट्रो. को. युके या संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार रशियाच्या नागरिकांनी कार्यालयीन कामाच्या वेळी जेवणाच्या सुट्टीदरम्यानही सेक्स करावा आणि जन्म दर वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले आहे. मेट्रोच्या बातमीत म्हटल्याप्रमाणे, पुतिन यांनी नागरिकांना जेवणाची सुट्टी आणि कॉफी ब्रेकचा वापर लोकसंख्या वाढीसाठी कसा होईल, असे प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. रशियामध्ये सध्या सरासरी प्रजनन दर प्रति महिला १.५ मुले एवढा आहे, लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी तो प्रति महिला २.५ मुले एवढा असायला हवा, असे सांगितले जाते.

“रशियन लोकांचे संरक्षण ही आपली सर्वाच्च राष्ट्रीय जबाबदारी आहे. रशियाचे भविष्य हे आपल्या लोकसंख्येवर आधारीत असणार आहे. त्यामुळे हा आपला राष्ट्रीय प्रश्न आहे”, अशी प्रतिक्रिया पुतिन यांनी दिली असल्याचे मेट्रोच्या बातमीत म्हटले आहे.

हे वाचा >> रशियातील महिलांनी ‘आठ’ पेक्षा जास्त मुलांना जन्म द्यावा; युक्रेन युद्धानंतर पुतिन यांचे विधान चर्चेत का?

राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आवाहनाला आरोग्य मंत्री डॉ. येवगेनी शेस्टोपालोव्ह यांनीही दुजोरा दिला आहे. नागरिक कामात व्यस्त असताना मुलांना जन्म देऊन त्यांच्या संगोपनासाठी किती वेळ देता येईल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना आरोग्य मंत्री शेस्टोपालोव्ह म्हणाले की, कामात व्यस्त असल्यामुळे मुलांना जन्म देता येत नाही, हे कारण असू शकत नाही. तुम्ही कामाच्या मधल्या वेळेत मिळणाऱ्या सुट्टीतही मुलांना जन्म देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नाहीतर आयुष्य पटकन निघून जाईल.

रशियामध्ये जन्म दर वाढावा यासाठी अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी हा एक प्रयत्न आहे. मॉस्कोमध्ये १८ ते ४० वयोगटातील महिलांना प्रजनन क्षमतेचे मोफत मुल्यांकन करु दिले जात आहे. यातून महिलांना पुन्हा पुन्हा मुलांना जन्म देण्यासाठी आरोग्य तपासणी करता येऊ शकते.

रशियाची लोकसंख्या किती?

रशियाची लोकसंख्या सध्या १४४ दशलक्षावरून २०५० पर्यंत १३० दशलक्षांपर्यंत कमी होऊ शकते, असे सांगितले जाते. ही रशियासाठी चिंतेची बाब आहे. लोकसंख्या घटत असल्यामुळे कर्मचाऱ्यांची कमतरता तसेच इतर विषयांची चिंता रशियाला सतावत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लष्कराची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न

फेब्रुवारी २०२२ साली रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. तेव्हापासून त्यांना अनेक सैनिक गमवावे लागले आहेत. यासाठीच चोरट्या मार्गाने आशिया खंडातील देशांमधून सैन्याची अवैध भरती केली जात आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना रशियन सैन्याचाही विस्तार करायचा आहे. सध्या रशियाकडे १.५ दशलक्ष सक्रिय सैन्य दल आहे. यात आणखी भर घालून सैन्य संख्या २.३८ दशलक्ष पर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे.