भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकवर ज्य़ेष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, एखाद्या आत्मसन्मान असलेल्या देशाने जे करायला हवे ते आपण केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


हसन म्हणाले, आपल्या सैन्याने आपल्यासाठी जे काही केले त्याचा आम्हाला अभिमान आहे. हे जवान आपले संरक्षण कवच आहेत आणि त्यांनी संरक्षण कवचाला साजेशी कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचा विशेष अभिमान वाटतो, आपल्या जवानांना सलाम.

मंगळवारी भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील खैबर पख्तूनच्या बालाकोट भागात जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले करीत मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांना कंठस्नान घातले यामध्ये जैशच्या टॉप कमांडर्सचा समावेश आहे.

जंगल आणि पर्वतीय भाग असणाऱ्या या भागात भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० या लढाऊ विमानांच्या हल्यात जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा मेहुणा उस्ताद गौरी याचा खात्मा करण्यात आला असल्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We have done what any self respecting nation would do says kamal haasan
First published on: 26-02-2019 at 17:05 IST