संजय गांधी हे त्यांच्या गाड्या आणि विमानांप्रती असलेल्या प्रेमामुळे प्रसिद्ध होते. १९७८ साली संजय गांधी यांना हलके विमान उडवण्याचे लायसन्स मिळालं होतं. पण जेव्हा इंदिरा गांधी यांची सत्ता गेली तेव्हा जनता पार्टीने संजय गांधी यांच्याकडून त्यांचं लायसन्स काढून घेतलं. परंतु इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांना हे लायसन्स पुन्हा देण्यात आलं.

संजय गांधी त्यांचा बराचसा वेळ सफदरजंग फ्लाइंग क्लबमध्ये घालवायचे. त्यांना विमान उडवणं इतकं आवडायचं की त्यांना प्रत्येक विमान उडवण्याची इच्छा होती. त्यांना हवेत विमानाच्या कसरती करणं आणि फायटर प्लेनसारख्या कलाबाजी दाखवणं खूप आवडायचं. मे १९८० मध्ये सफदरजंग फ्लाइंग क्लबमध्ये पिट्स एस २ए विमान मागवण्यात आलं होतं. या विमानाला बऱ्याच वर्षांपासून आयात करण्याची तयारी सुरूच होती.

संजय गांधी यांना या विमानात विशेष रस होता. वरिष्ठ पत्रकार आणि लेखक विनोद मेहता यांनी आपल्या ‘द संजय स्टोरी’ या पुस्तकात लिहलंय की या दोन सीटर विमानाला खास करून हवेत कलाबाजी करण्यासाठी तयार केलं गेलं होतं. आणि हेच कारण होतं ज्यामुळे संजय गांधी या विमानाला उडवण्यासाठी इतके उत्सुक होते.

रतन टाटांनी का घेतला अविवाहित राहण्याचा निर्णय? जाणून घ्या कारण

संजय गांधी यांच्या विमानाचा झाला अपघात

२३ जून १९८० ला लगेचच संजय गांधी फ्लाईंग क्लबला पोहचले. विमानात त्यांच्या सोबत दिल्ली फ्लाईंग क्लबचे पूर्व इन्स्ट्रक्टर सुभाष सक्सेना सुद्धा होते. ते दोघे मिळून क्लबच्या वर आकाशात कलाबाजी दाखवू लागले. ३ चक्कर मारल्यानंतर इंजिनने काम करणं बंद केलं. दोघांना काही कळण्याच्या आतच विमान क्रॅश झाले.

वरिष्ठ पत्रकार आणि लेखिका तवलीन सिंग यांनी आपल्या दरबार या पुस्तकात लिहलंय की त्या सकाळी ज्यांनीही संजय गांधी यांचं विमान प्रत्यक्ष पडताना पाहिलं त्या सर्वांचं हेच म्हणणं होतं की ते अतिशय भयानक पद्धतीने विमान उडवत होते. सफदरजंग क्लबपासून काही अंतरावरच हा अपघात झाला.

संजय गांधींच्या खिश्यात काय शोधत होत्या इंदिरा गांधी ?

तवलीन सिंग यांनी पुढे लिहलंय, ‘जे पत्रकार घटनास्थळी पोहोचले त्यांनी ही घटना सविस्तरपणे सांगितली. पत्रकारांच्या अनुसार संजय गांधी यांच्या आई म्हणजेच इंदिरा गांधी दुर्घटनेच्या काही वेळानंतर तिथे पोहचल्या. असं सांगितलं जातं की त्या संजय गांधींच्या खिश्यात काहीतरी शोधत होत्या. काही वेळाने त्या परतल्या.’ त्यानंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अश्या चर्चा रंगू लागल्या की इंदिरा गांधी संजय गांधी यांच्या खिश्यात बँक लॉकरच्या चाव्या शोधत होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक अफवा अशी होती की संजय गांधी यांच्या मृत्यूच्या मागे काही विदेशी गुप्तचर यंत्रणांचा सहभाग होता. कारण इंदिरा गांधी सोवियत युनियनच्या निकटवर्तीय मानल्या जायच्या. आणखी एक अफवा अशी देखील होती की संजय गांधी यांच्या प्लेन क्रॅशच्या मागे मुंबईच्या अंडरवर्ल्ड आणि गॅंगस्टरचा हात होता. परंतु अद्याप या गोष्टींची पुष्टी झालेली नाही.