जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी म्हणजेच Apple चे प्रत्येक प्रोडक्ट विश्वासार्ह, वापरण्यास सोईचे असते. तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची असलेली ही कंपनी सध्या मात्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील अॅपलच्या मुख्यालयात एका पांढऱ्या रंगाच्या पावडरमुळे गोंधळ उडाला. पांढऱ्या रंगाचे पावडर मिळाल्यामुळे खरबदारी म्हणून अॅपलचे सर्वात मोठे कार्यालय अशंत: रिकामे करावे लागले

अॅपलच्या सर्वात मोठ्या कार्यालयात नेमकं काय घडलं ?

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

मिळालेल्या माहितीनुसार कॅलिफोर्निया येथे असलेल्या अॅपलच्या मुख्यालयात मंगळवारी एका बंद लिफाफ्यात पांढऱ्या रंगाचे पावडर दिसून आले. यावेळी फायर अलार्मदेखील वाजला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून अॅपलचे मुख्यालय अंशत: रिकामे करण्यात आले. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर अग्निशमन विभागाने कार्यालयाची तत्काळ तपासणी केली. पूर्ण तपासणी केल्यानंतर कोणतीही धोकादायक वस्तू न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना मुख्यालयात परत जाण्यास सांगण्यात आले होते.

ही घटना घडल्यानंतर अॅपल मुख्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली. कार्यालयात आढळलेल्या लिफाफ्यात कोणताही धोकादायक पदार्थ नव्हता. त्यामुळे सर्व कामे सुरळीत झाली असून मुख्यालय पूर्णपणे खुले आहे, असे कर्मचाऱ्यांना आलेल्या मेलमध्ये सांगण्यात आले होते.

फक्त पांढऱ्या रंगाच्या पावडरमुळे अॅपलचे मुख्यालय अंशत: रिकामे करावे लागले. मात्र, मुख्यालयात सापडलेले पांढऱ्या रंगाचे पावडर म्हणजे नेमके काय होते, हे अजूनतरी स्पष्टपणे समजू शकलेले नाही.