काही महिन्यांपूर्वी दोन भारतीय औषधांवर जागतिक आरोग्य संघटनेकडून आक्षेप घेण्यात आला होता. उझबेकिस्तानमध्ये हे भारतीय कफ सिरप प्यायल्यामुळे काही मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आणखीन एका भारतीय कफ सिरपबाबत WHO आक्षेप घेतला आहे. गेल्या सात महिन्यांत अशा प्रकारे WHO कडून आक्षेप घेतलं जाणारं हे तिसरं भारतात उत्पादित होणारं कफ सिरप ठरलं आहे. मार्शल आयलँड्स आणि मायक्रोनेशिया या ठिकाणी हे सिरप विकलं जात होतं. दरम्यान, WHO च्या अलर्टनंतर कफ सिरप उत्पादक कंपनीकडून त्यांच्या नावाने बनवट औषध तयार केलं जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नेमकं कोणतं आहे हे औषध?

हे एक कफ सिरप असून त्याचं मूळ इंग्रजी नाव ग्वाईफेनेसिन (Guaifenesin) असं आहे. या कफ सिरपमध्ये मान्य मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात जायथिलिन ग्लायकोल आणि इथिलेन ग्लायकोल हे घटक असल्याचं ऑस्ट्रेलियाच्या दर्जा तपासणी विभागानं केलेल्या तपासणीत आढळून आलं होतं. उझबेकिस्तानमध्ये १८ आणि गॅम्बियामध्ये ७० मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सिरपमध्येही हेच घटक जास्त प्रमाणात आढळून आल्याचं समोर आलं आहे.

India signs deal with Iran to run Chabahar port
चाबहार बंदराच्या संचालनासाठी भारताचा इराणशी करार ; मध्य-आशियात व्यापारात वाढीला पूरक
Who exactly is Archit Grover of Indian origin
कॅनडात सोन्याची आजवरची सर्वात मोठी फ्लिमी स्टाइल चोरी; अटकेतील भारतीय वंशाचा अर्चित ग्रोव्हर नेमका कोण?
end of the day Bombay Stock Market index Sensex rise by 260 points
तीन सत्रातील घसरणीला लगाम, सेन्सेक्समध्ये २६० अंशांची भर
Increase in India exports to 115 countries worldwide
जगभरात ११५ देशांमध्ये भारताच्या निर्यातीत वाढ; केंद्राकडून सरलेल्या आर्थिक वर्षातील आकडेवारी जाहीर
उद्योगधंद्यांच्या कर्जात वाढ, तर मार्चमध्ये  वैयक्तिक कर्जात  घट; ‘केअरएज रेटिंग्ज’च्या अहवालात बँकिंग व्यवसायाबाबत आश्वासक चित्र
loksatta analysis elon musk visits china to deals self driving
एलॉन मस्क यांच्या चीन दौऱ्याच्या केंद्रस्थानी सेल्फ ड्रायव्हिंग सॉफ्टवेअर… काय आहे ही प्रणाली? टेस्लासाठी चीन इतका महत्त्वाचा का?
loksatta analysis causes of forest fires in uttarakhand
विश्लेषण : उत्तराखंडमधील वणवा आटोक्यात का येत नाही? वणव्यांची समस्या जगभर उग्र का बनतेय?
Companies weakest quarterly revenue growth since September 2021
कंपन्यांची  सप्टेंबर २०२१ नंतर सर्वात कमकुवत तिमाही महसुली वाढ; ‘क्रिसिल’च्या अहवालाचा दावा

WHO चं नागरिकांना आवाहन

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं हे औषध न वापरण्याचं आवाहन लोकांना केलं आहे. तसेच, औषध नियंत्रण विभागांना यासंदर्भात काळजी घेण्याचेही निर्देश WHO नं दिले आहेत. याशिवाय, या औषधाच्या उत्पादक कंपनीलाही कच्च्या मालाची अधिक काळजीपूर्वक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

भारतात कुठे होतं उत्पादन?

या औषधाचं उत्पादन पंजाबमध्ये होत असल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात दिली आहे. पंजाबमधील क्यूपी फार्माचेम लिमिटेड कंपनीकडून हे औषध तयार केलं जात असून हरियाणातील थ्रिलियम फार्माकडून या औषधाचं मार्केटिंग केलं जातं. आजपर्यंत उत्पादक कंपनी किंवा मार्केटिंग कंपनीकडून या औषधासंदर्भात सुरक्षा किंवा दर्जासंदर्भात कोणतीही गॅरंटी देण्यात आली नसल्याचंही WHO कडून स्पष्ट करण्यात आलं आहे.