लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता दहावीच्या निकालाची उत्सुकता आहे. दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे दहावीच्या निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Boat Drowned in Ujani Dam
उजनी धरण पात्रात प्रवासी बोट बुडाली; एकाचा जीव वाचला, सहाजण बेपत्ता, शोधमोहिम सुरू
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
uddhav thackeray sharad pawar narendra modi
“लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे भाजपाबरोबर जातील”, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यानंतर शरद पवार म्हणाले…
Hundreds of Pune students stuck in Kyrgyzstan
पुण्याचे शेकडो विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये अडकले… घडले काय?
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
SSC Results Date Maharashtra Board 10th Marksheet
१० वीच्या निकालाच्या तारखेबाबत मोठी माहिती; महाराष्ट्र बोर्डाचं निकालाचं नियोजन कसं आहे? कुठे व कधी पाहाल, दहावीचे मार्क्स?
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…

राज्य मंडळाने बारावी आणि दहावी या दोन्ही परीक्षांचे निकाल गेल्यावर्षीपेक्षा लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने नियोजन केले होते. त्या प्रमाणे बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार राज्य मंडळाकडून दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर केला जाणार असून, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनीही त्यास दुजोरा दिला.

आणखी वाचा-सीएनजी टंचाईने पुणेकरांचे हाल! रांगेत तब्बल आठ तास थांबण्याची वाहनचालकांवर वेळ

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले होते. त्यात राज्य स्तरावरून भरारी पथकांची नियुक्त करण्यात आली होती. तसेच जिल्हा स्तरावरही स्वतंत्र पथके नेमण्यात आली होती. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत गैरप्रकारांची संख्या घटली, तर दहावीच्या परीक्षेत गैरप्रकारांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले होते. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल २ जून रोजी जाहीर करण्यात आला होता. गेल्यावर्षी ९३.८३ टक्के निकाल लागला होता. यंदा बारावीच्या निकालात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा दहावीचा निकाल किती टक्के लागणार, गेल्यावर्षीच्या तुलनेत निकाल वाढणार का, या बाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.