करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने संपूर्ण जगावर भीतीचं सावट निर्माण केलं असताना डेल्टाच्या तुलनेत तो कमी धोकादायक असल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी मात्र ओमायक्रॉनमुळे संपूर्ण जगभरात मृत्यू होत असताना सौम्य म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका असा इशारा दिला आहे.

ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी करोनाचा नवा व्हेरियंट वेगाने संसर्ग फैलावत असून मोठ्या प्रमाणात लोकांना लागण होत असल्याचं सांगितलं आहे. अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनने डेल्टालाही मागे टाकलं असून याचा अर्थ रुग्णालयांमध्ये गर्दी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Corona Cases in India: करोनाचा पुन्हा एकदा विस्फोट; देशात सात महिन्यानंतर १ लाखापेक्षा जास्त रुग्णांची नोंद

“ओमायक्रॉन डेल्टाच्या तुलनेत आणि खासकरुन लसीकरण झालेल्यांमध्ये कमी गंभीर असल्याचं दिसून येत आहे, पण याचा अर्थ त्याला सौम्य म्हणून दुर्लक्षित करावं असा होत नाही,” असंही ट्रेड्रोस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. “मागील अनेक व्हेरियंटप्रमाणे ओमायक्रॉनदेखील लोकांना रुग्णालयात दाखल होण्यास भाग पाडत असून मृत्यूसाठी जबाबदार ठरत आहे,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

“खरं तर केसेसची त्सुनामी इतकी मोठी आणि जलद आहे की जगभरातील आरोग्य यंत्रणांवरील बोझा वाढला आहे.” असं ते म्हणाले आहेत. गेल्या आठवड्यात जगभरात ९० लाख ५ हजार रुग्ण आढळल्याची नोंद जागतिक आरोग्य संघटनेकडे आहे. ही वाढ तब्बल ७१ टक्क्यांची आहे.

Covid: जागतिक आरोग्य संघटनेचा धोक्याचा इशारा, म्हणाले, “करोनाची त्सुनामी येणार आणि…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टेड्रोस यांनी श्रीमंत देशांकडून लसींचा जास्तीत जास्त साठा घेतला जात असल्याने नाराजी जाहीर केली असून यामुळे इतर व्हेरियंट निर्माण होण्यासाठी परिपूर्ण वातावरण तयार केलं आहे अशा शब्दांत टीका केली. यामुळे किमान २०२२ मध्ये तरी लसींचं योग्य वाटप व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.