अलीकडेच हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालातून हिंडेनबर्ग कंपनीने अदाणी समूहावर गंभीर आरोप केले होते. अदाणींच्या कंपनीत शेल कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये गुंतल्याचा दावा हिंडेनबर्ग कंपनीने केला होता. याबाबतचे अनेक प्रश्न हिंडेनबर्ग कंपनीने अदाणी समूहाला विचारले होते. यातील कोणत्याही प्रश्नाला अदाणी समूहाने उत्तर दिलं नव्हतं.

यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अदाणी समूहावर गंभीर आरोप केले. अदाणींच्या कंपन्यांमध्ये शेल कंपन्याद्वारे गुंतवलेले २० हजार कोटी रुपये कुणाचे आहेत? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला होता. अदाणी प्रकरणावरून देशातील राजकीय वातावरण तापलं. काँग्रेसने अनेक ठिकाणी आंदोलने केली. या सर्व घडामोडीनंतर अदाणी समूहाने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच कंपन्यांमध्ये गुंतवलेला पैसा कुठून आला? याचं उत्तरही अदाणी समूहाने दिलं.

हेही वाचा- राहुल गांधींचं Word Puzzle ट्वीट चर्चेत! गुलाम, शिंदे, हिमंतांसह ‘ही’ नावं घेत म्हणाले, “अदाणी……”

अदाणी समूहाने सोमवारी प्रसिद्धीपत्रक जारी करत सांगितलं की, अबू धाबी येथील ग्लोबल स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी PJSC (IHC) यांसारख्या गुंतवणूकदारांनी अदाणी एंटरप्राइझ लिमिटेड आणि अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) या समूह कंपन्यांमध्ये सुमारे २.५९३ बिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली होती. त्यानंतर गुंतवणूकदारांनी २.७८३ बिलियन अमेरिकन डॉलरचा निधी उभारण्यासाठी अदाणी टोटल गॅस लिमिटेड आणि अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपन्यांमधील शेअर्स विकले.

हेही वाचा- अदाणी घोटाळ्यातील सत्य बाहेर येण्यासाठी जेपीसीच योग्य अस्त्र : पृथ्वीराज चव्हाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“यानंतर संबंधित गुंतवणूकदार कंपन्यांनी नवीन व्यवसायाला चालना देण्यासाठी हाच पैसा अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड, अदाणी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदाणी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदाणी पॉवर लिमिटेड यासारख्या कंपन्यांमध्ये पुन्हा गुंतवला” असं स्पष्टीकरण अदाणी समूहाने दिलं आहे.