Who Is Aqeel Khan, Who Molestated Australian Women Cricketers: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये दोन ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेड काढल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला अकील खान उर्फ नित्रा (२९) हा एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त हिमानी मिश्रा, ज्यांनी दोन्ही ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंचा जबाब नोंदवला, त्या म्हणाल्या की, “अकील खानवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.”

कोण आहे आरोपी अकील खान?

अकील खान हा खजराणा येथील रहिवासी आहे, पण सध्या तो इंदूरच्या आझाद नगरमध्ये राहतो, असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश दंडोटिया यांनी सांगितले. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, अकीलविरोधात किमान १० गुन्हेगारी खटले सुरू आहेत. यात विनयभंग, दरोडा, हल्ला आणि हत्येचा प्रयत्न अशा आरोपांचा समावेश आहे. १० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेनंतर तो काही महिन्यांपूर्वीच भैरवगढ तुरुंगातून सुटला आहे. याचबरोबर त्याच्याविरोधातील काही खटले २०१२ पासून सुरू आहेत.

भारतीय दंड संहिता व्यतिरिक्त, त्याच्यावर शस्त्रास्त्र कायदा, अंमली पदार्थ विरोधी कायदा आणि नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अॅक्ट अंतर्गत अनेक गुन्हे आहेत, असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

काय आहे प्रकरण?

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन महिला संघ रॅडिसन हॉटेलमध्ये थांबला होता. जवळच असलेल्या एका कॅफेत ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला खेळाडू चालत जात होत्या. त्याचदरम्यान, आरोपी दुचाकीवरून तिथे आला आणि दोन्ही महिला क्रिकेटपटूंची छेड काढू लागला. तिथे असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या दुचाकीचा नंबर टिपला आणि दुसऱ्या एका कारचालकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

याचबरोबर ऑस्ट्रेलियन महिला संघाचे सुरक्षा व्यवस्थापक डॅनी सिमन्स यांनीही इंदूरच्या एमआयजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तक्रारीची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण?

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन महिला संघ रॅडिसन हॉटेलमध्ये थांबला होता. जवळच असलेल्या एका कॅफेत ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला खेळाडू चालत जात होत्या. त्याचदरम्यान, आरोपी दुचाकीवरून तिथे आला आणि दोन्ही महिला क्रिकेटपटूंची छेड काढू लागला. तिथे असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या दुचाकीचा नंबर टिपला आणि दुसऱ्या एका कारचालकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

याचबरोबर ऑस्ट्रेलियन महिला संघाचे सुरक्षा व्यवस्थापक डॅनी सिमन्स यांनीही इंदूरच्या एमआयजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तक्रारीची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बीसीसीआयची प्रतिक्रिया

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी मध्य प्रदेश पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले. ते म्हणाले, “ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. या प्रकारच्या घटनांमुळे बदनामी होते. आरोपीला पकडण्यासाठी तातडीने कारवाई केल्याबद्दल आम्ही मध्य प्रदेश पोलिसांचे कौतुक करतो.”

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला या प्रकरणावर एएनआयशी बोलताना म्हणाले की, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आम्ही याचा निषेध करतो. असे प्रकार टाळण्यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊ. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.”