लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी एक फोटो दाखवला. हा फोटो एका महिलेचा होता. या महिलेचं नाव मॅथ्युस फेरारो आहे असं सांगत राहुल गांधींनी हा दावा केला की ब्राझीलच्या या मॉडेलने हरियाणा निवडणुकीत १० मतदान केंद्रांवरुन २२ वेळा मतदान केलं. मात्र तुम्हाला या फोटोतली महिला कोण आहे आणि ती खरंच मॉडेल आहे का? याबाबत ठाऊक आहे का? चला आपण जाणून घेऊ तिच्याबद्दल.
राहुल गांधीचा दावा नेमका काय?
राहुल गांधी म्हणाले की, हरियाणाच्या प्रत्यक्ष मतदान यादीत, एकाच महिलेचा फोटो अनेक ठिकाणी दिसतो. काही लोकांचे वय त्यांच्या फोटोंपेक्षा वेगळे असते. मी तुम्हाला विचारतो, ही यादी नेमकी आहे तरी काय? एक महिला दोन मतदान केंद्रांवर २२३ वेळा दिसते. निवडणूक आयोगाने हे स्पष्ट करावे की ही महिला इतक्या वेळा का दिसली? म्हणूनच निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज काढून टाकतो. हरियाणात अशी हजारो उदाहरणे आहेत. जर सीसीटीव्ही फुटेज नसेल तर कोणालाही कळणार नाही. मला हरियाणाच्या जनतेला हा प्रश्न विचारायचा आहे की ही कोण आहे?
राहुल गांधी यांचं वक्तव्य नेमकं काय?
निवडणूक आयोगाला स्वच्छ निवडणूक नको आहे. हा ठोस पुरावा आहे. राहुल यांनी एका ब्राझिलियन मुलीचा फोटो दाखवला आणि विचारले, “निवडणुकीत तिची भूमिका काय आहे?” ते म्हणाले की, माझा एक प्रश्न आहे: हरियाणाच्या मतदार यादीत ब्राझिलियन मुलीची भूमिका काय आहे? हरियाणातील पाच श्रेणींमध्ये २५ लाख मते चोरीला गेली. एका विधानसभा मतदारसंघात एका महिलेने २२ वेळा मतदान केले. या महिलेने सरस्वती, स्विटी, संगिता अशा विविध नावांनी मतदान केलं आहे. ही महिला ब्राझीलची मॉडेल असून तिचं नाव मॅथ्युस फेरारो आहे असंही राहुल गांधी म्हणाले. तसंच त्यांनी तुम्ही या फोटोसह दिलेला कोड स्कॅन करुनही माहिती घेऊ शकता असंही सांगितलं. त्यानंतरच या महिलेबाबतची माहिती समोर आली आहे.
ब्राझील मॉडेल बाबत काय माहिती समोर आली?
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एक क्यूआर कोड दाखवला. तो स्कॅन केल्यानंतर दिसतं आहे की या महिलेचा पोटो मॅथ्यूज फेरारो या ब्राझीलच्या छायाचित्रकाराने क्लिक केला आहे. एवढंच नाही तर हा फोटो आठ वर्षांपूर्वीचा आहे. तसंच हा फोटो ४ लाख २२ हजार ११९ वेळा डाऊनलोड झाला आहे. २०१७ पासून हा फोटो इंटरनेटवरील विविध वेबसाईट, लिंक्डइन प्रोफाईल आणि शादी डॉट कॉमसारख्या साईट्सवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्या ज्या अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे त्यात या महिलेची नावं वेगवेगळी आहेत. या महिलेचं नाव काय? हे मात्र समजू शकलेलं नाही. तसंच ती ब्राझीलची आहे की भारतीय याचेही तपशील नाहीत. असं असूनही राहुल गांधींनी ही महिला ब्राझीलची मॉडेल आहे आणि तिने २२ वेळा मतदान केलं आहे असा दावा कसा काय केला? हा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे. Republic ने हे वृत्त दिलं आहे.
फोटो बाबत काय माहिती समोर?

Unsplash, Pexels वर फोटोग्राफरचं नाव मॅथ्युज फेरारो आणि आहे त्याने हा फोटो क्लिक केला आहे हे दिसून येतं. अनेक फेक प्रोफाईल्सवर हा फोटो वापरण्यात आल्याचंही दिसून येतं आहे. राहुल गांधी यांना हा दावा केला आहे की ही महिला ब्राझीलची मॉडेल आहे आणि तिने हरियाणाच्या निवडणुकीत २२ वेळा मतदान केलं आहे. ज्यात तिने सीमा, स्विटी, सरस्वती अशी अनेक नावं बदलून मतदान केलं आहे. मात्र फोटोचे तपशील तपासले तर ही महिला ब्राझीलची मॉडेल आहे की भारतीय आहे हे स्पष्ट होत नाही.
