संपूर्ण जगामध्ये हाहाकार उडवून देणाऱ्या करोना व्हायरसची उत्पत्ती कशी झाली? हा व्हायरस कुठून आला? त्याचे मूळ काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञांचे पथक अखेर वुहानमध्ये दाखल झाले आहे. जगामध्ये लाखो नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या, अनेक देशांचे अर्थचक्र ठप्प करणाऱ्या या व्हायरसने मानवी शरीरात कसा प्रवेश केला? ते शोधून काढण्यासाठी तज्ज्ञांची टीम वुहानमध्ये पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कामाला सुरुवात करण्याआधी दहा शास्त्रज्ञांच्या या टीमला दोन आठवडे क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार आहे. करोना व्हायरसची उत्पत्ती कशा झाली? हे अद्याप न उलगडलेले कोडे आहे. काही तज्ज्ञांच्या मते प्राण्यांमधून या विषाणूने मानवी शरीरात प्रवेश केलाय, तर काहींच्या मते हे मानवनिर्मिती संकट आहे. त्यासाठी वुहानमधल्या प्रयोगशाळेकडे संशयाने पाहिले जाते.

करोना व्हायरसचा पहिला रुग्ण चीनच्या वुहान शहरात आढळला होता. त्यानंतर हा संसर्गजन्य आजार जगभरात वेगाने फोफावला. आधीच या व्हायरसचे मूळ शोधण्याला बराच विलंब झाला आहे.

चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढतेय

WHO ची टीम चीनमध्ये दाखल झालेली असताना, तिथे पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढतेय. उत्तर चीनमध्ये पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढतेय. चीनने करोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले होते. पण तिथे पुन्हा रुग्ण संख्या वाढतेय. एका प्रांतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who team arrives in wuhan as china reports first virus death dmp
First published on: 14-01-2021 at 12:51 IST