राहुल गांधी स्वेटर का घालत नाहीत? हे मी त्यांना विचारलं नाही कारण मी राहुल गांधींना ओळखतो. त्यांची जीवनचर्या मला माहित आहे. मी राहुल गांधींसोबत चाललो त्यावेळी राहुल गांधी यांनी माझी काळजी केली. ते म्हणाले तुम्ही आत्ताच मोठा त्रास सहन करून आला आहात. त्यामुळे जास्त चालू नका. पण मी त्यांच्यासोबत पहिला टप्पा पूर्ण केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी यांनी मिठी का मारली?

राहुल गांधींनी मला भेटल्यावर मिठी मारली कारण ते नेहमी मला प्रेमानेच भेटतात. गुरूवारपासून ते माझी वाट बघत होते. गुरूवारी मी येईन असं त्यांना वाटलं होतं. ज्या कंटेनरमध्ये राहुल गांधी राहात आहेत तिथेच ते गुरूवारीही राहिले. पावसामुळे चिखल झाला होता तरीही ते तिथेच थांबले होते. या यात्रेत लोकं खूप उत्साहाने सहभागी होत आहेत. आम्ही १२ किमी एकत्र चाललो. जम्मूतले शिवसैनिकही या ठिकाणी चालले. बाळासाहेब ठाकरे जिंदाबादच्या घोषणाही त्यांनी दिल्या. ५० खोके एकदम ओके या घोषणाही दिल्या. मला राहुल गांधींनी सांगितलं बघा महाराष्ट्रातली घोषणा देत आहेत.

राहुल गांधी यांनी माझ्याकडे सगळी चौकशी केली

माझ्याकडे राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंचीही चौकशी केली. मला का अटक केली हे राहुल गांधी यांना माहित होतं. त्यामुळे त्यांनी माझी त्यासंदर्भातली चौकशी केली आहे. डरो मत हा त्यांचा आणि माझा सामायिक मंत्र आहे. माझ्या घरातल्यांचीही चौकशी राहुल गांधी यांनी केली. मी तुरुंगात असतानाही राहुल गांधी यांनी चौकशी केली होती.

महाराष्ट्राच्या राजकारणाविषयीही आमच्यात चर्चा झाली

महाराष्ट्राच्या राजकारणावर आमच्या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते महाराष्ट्राला सांगणं म्हणजे नवा वाद निर्माण करणं होईल. आम्ही अनेकदा चर्चा करतो. आज चालत असताना आम्ही या विषयावर बोललो. मात्र काय चर्चा झाली ते मी आत्ता सांगणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्याकडे बरीच पक्की माहिती असते. शिवसेनेचं संघटन कसं मजबूत आहे? आमदार, खासदार गेले म्हणून पक्ष संपत नाही यावर आम्ही चर्चा केली असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ही यात्रा हुकूमशाहीच्या विरोधातही आहे. देशात आज सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. काँग्रेस पक्षाशिवाय विरोधी पक्षांची आघाडी किंवा ऐक्य शक्य नाही. काँग्रेसला वगळून विरोधकांची आघाडी निर्माण करत असतील तर ते भाजपाला मदत कत आहेत. काँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी पूर्ण होऊ शकत नाही. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस हा मोठा पक्ष आहे हे विसरता येणार नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did rahul gandhi gave hug to me in bharat jodo yatra sanjay raut gave the answer scj
First published on: 20-01-2023 at 13:02 IST