२२ एप्रिलच्या दिवशी पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे हे समजल्यानंतर भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर राबवत उत्तर दिलं. आता काँग्रेसच्या नेत्या शमा मोहम्मद यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. प्रत्येकजण पाकिस्तानची साथ देतो आहे, भारताच्या बाजूने कुणीच का नाही? दहशतवादाला खतपाणी घालणारा देश असूनही त्यांना ट्रेड डील मिळत आहेत, ते एमओयू करत आहे हे कसं काय? असा प्रश्न शमा मोहम्मद यांनी विचारला आहे

शमा मोहम्मद रोहित शर्मावरच्या वक्तव्यामुळेही चर्चेत

काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेटर रोहीत शर्मावर टीका केली होती. त्याचं वजन वाढलं आहे वगैरे त्यांनी म्हटलं होतं. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. शमा मोहम्मद म्हणाल्या, “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी वारंवार सांगितलं आहे की चार दिवस जो संघर्ष सुरु आहे, त्यात शस्त्र विरामासाठी मी मध्यस्थी केली. शमा मोहम्मद म्हणाल्या डोनाल्ड ट्रम्प यांना वाटतं आहे की नवी दिल्ली आणि इस्लामाबाद एकाच बास्केटमध्ये आहेत.”

प्रत्येकजण पाकिस्तानबरोबर का?

ANI शी बोलताना शमा मोहम्मद म्हणाल्या, ट्रंप यांनी आत्तापर्यंत ११ वेळा हे सांगितलं आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविरामासाठी मी मध्यस्थी केली. भारत आणि पाकिस्तान यांच्या व्यापाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यात येईल असं सांगितलं. त्यांनी शस्त्रविराम आणि भारत यांना एकाच बास्केटमध्ये काटून दिलं आहे. पाकिस्तान दहशतवादाचा पुरस्कर्ता देश आहे. तर आपला देश 26/11 च्या हल्ल्याचे पीडत आहोत. २६/११ चा हल्ला घडल्यानंतर सगळं जग भारताबरोबर उभं होतं, आता आपल्याबरोबर कोण आहे? पाकिस्तानसह व्यवहार केले जात आहेत, पाकिस्तानबरोबर सगळे आहेत, आपल्या देशाबरोबर म्हणजेच भारतासह कुणीच का नाही?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मे महिन्यात राबवण्यात आलं ऑपरेशन सिंदूर

पहलगाम या ठिकाणी २६ निरपराध पर्यटकांची हत्या करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान होता. त्यानंतर भारताने मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान येथील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले. भारतानेही या हल्ल्यांचं उत्तर दिलं. दरम्यान चार ते पाच दिवस जो संघर्ष सुरु होता तो थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली अशी माहिती त्यांनीच ट्वीट करत दिली होती. आता काँग्रेसच्या नेत्या शमा मोहम्मद यांनी प्रत्येकजण पाकिस्तानसह का आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.