नरेंद्र मोदी यांना प्रचारप्रमुख केल्यानंतर जनता दलाने (यु) उपस्थित केलेल्या मुद्दय़ांप्रकरणी भाजपने त्यांच्यावर टीका केली असून त्यांनी अन्य पक्षांच्या अंतर्गत कारभारात नाक खुपसू नये, असा सल्ला दिला आहे. प्रचारसमितीच्या प्रमुखपदी कोणास नेमायचे कोणाला बढती द्यायची, हा आमचा अंतर्गत मामला आहे, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते एम.व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले. उद्या जनता दलाचे अध्यक्ष कोण असावे याबद्दल आम्ही दिलेला सल्ला त्यांना मानवेल काय, अशीही विचारणा नायडू यांनी केली. मोदी यांना बढती देण्यात आल्यामुळे आघाडीचा त्याग केल्याच्या जनता दलाच्या वक्तव्यावर असमाधान व्यक्त करून त्यांचे हे कारण समाधानकारक नसल्याची टीका नायडू यांनी केली. लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी राजकीय शक्तींची पुनर्रचना झाली असेल, असे भाकीत नायडू यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2013 रोजी प्रकाशित
जनता दलाने भाजपच्या अंतर्गत कारभारात नाक खुपसू नये-नायडू
नरेंद्र मोदी यांना प्रचारप्रमुख केल्यानंतर जनता दलाने (यु) उपस्थित केलेल्या मुद्दय़ांप्रकरणी भाजपने त्यांच्यावर टीका केली असून त्यांनी अन्य पक्षांच्या अंतर्गत कारभारात नाक खुपसू नये, असा सल्ला दिला आहे. प्रचारसमितीच्या प्रमुखपदी कोणास नेमायचे कोणाला बढती द्यायची, हा आमचा अंतर्गत मामला आहे,
First published on: 18-06-2013 at 12:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why the noise over partys internal matter venkaiah naidu to jdu