भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय. मोदी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना माघार घेण्यास सांगणार का असा प्रश्न सुब्रमण्यम स्वामींनी उपस्थित केलाय. रशिया हा ब्रिक्स देशांचा सदस्य राष्ट्र असल्याचा संदर्भ देत स्वामींनी ही टीका केलीय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: कोणी म्हणतंय हिटलर तर कोणी म्हणतंय नरकात जळणार; जगभरातील Anti-Putin मोर्चांमधील पोस्टर्स पहिलेत का?

ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश असलेल्या ब्रिक्स देशांच्या समुहाच्या स्थापनेला २०२१ साली १५ वर्ष पुर्ण झाली. त्यानिमित्त या देशांनी काही समान कार्यक्रमांवर सहमती दर्शवली होती. सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-ब्रिक्स सहकार्य’ अशी २०२१ च्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना होती. याच परिषदेमध्ये संमत करण्यात आलेल्या ठरावांच्याविरोधात जात रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याचं सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलंय. याच परिषदेचा संदर्भ देत त्यांनी आता पंतप्रधान मोदी पुतिन यांना माघार घ्यायला सांगणार का असा प्रश्न उपस्थित केलाय.

नक्की पाहा >> Video: “मोदीजी एक महिना तुम्ही युपी इलेक्शनमध्ये व्यस्त होता, बायडेन यांना…”; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थिनीचा प्रश्न

“रशियाने युक्रेनमध्ये ब्रिक्स देशांनी मागील वर्षी मंजूर केलेल्या दिल्ली कराराचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना माघार घ्यायला सांगणार का?”, असा प्रश्न सुब्रमण्यम स्वामींनी ट्विटरवरुन विचारलाय.

मोदी-पुतिन चर्चा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन युक्रेनमधील सर्व घडामोडींबद्दल गुरुवारी (२४ फेब्रुवारी २०२२ रोजी) रात्री उशीरा चर्चा झाल्याची माहिती भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलीय. यावेळी पुतिन यांनी सध्या घडलेल्या घडामोडींबद्दल पंतप्रधान मोदींना सविस्तर माहिती दिली. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी, ‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात,’ या भूमिकेचा पुनरूच्चार करून हिंसाचार थांबविण्याचे आवाहन पुतिन यांना केलं होतं.

नक्की पाहा >> Video: रणगाडा बंद पडल्याने अडून पडलेल्या रशियन सैनिकांजवळ येऊन युक्रेनियन चालक म्हणाला, “मी तुम्हाला…”

चार मंत्री परदेशात जाणार…
मोदींच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अद्याप अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसह भारतीयांच्या देशात स्थलांतराच्या प्रक्रियेच्या समन्वयासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या ‘चेचेन स्पेशल फोर्स’चा युक्रेनकडून खात्मा

काय आहे ब्रिक्स समूह
ब्रिक्स हा प्रादेशिक घटकांवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकणाऱ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समूह आहे. ब्राझील, रशिया, भारत, आणि चीन या देशांच्या नेत्यांनी एकत्र येऊन २००६ मध्ये स्थापन केलेल्या ब्रिक (BRIC) समूहाची पहिली शिखर परिषद २००९ साली येकातेरीन्बर्ग (रशिया) या ठिकाणी पार पडली. २०१० साली या समूहात दक्षिण आफ्रिका हा देश समाविष्ट झाल्यानंतर त्याचे नामकरण ब्रिक्स (BRICS) समूह असे करण्यात आले.

जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास ४१ % लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ब्रिक्स समूहाचा जागतिक व्यापारात १६ % हिस्सा असून जागतिक जी.डी.पी. मध्ये २४ % हिस्सा असल्यामुळे हे देश गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक आर्थिक विकासाचे मुख्य इंजिन म्हणून ओळखले जातात. या समूहाने एकूण २९.३ % भूभाग व्यापला आहे.

नक्की वाचा >> Ukraine War : युक्रेनच्या मदतीसाठी युरोपीयन महासंघाचा ऐतिहासिक निर्णय; म्हणाले, “पहिल्यांदाच आम्ही हल्ला झालेल्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्दय़ांवर सहकार्य आणि संवाद वाढवण्यासाठी शांतता, सुरक्षा आणि समृद्धीसाठी जागतिक राजकीय घडामोडी मध्ये बहुपक्षीय प्रणालींची सुधारणा आणि दहशतवाद विरोधी सहकार्य या मुद्दय़ांना प्राधान्य देण्याची भूमिका ब्रिक्सच्या माध्यमातून भारताने कायमच घेतलीय.