Rajnath Singh : भारताच्या संयमाच्या कोणी गैरफायदा घेतला तर त्याला कालप्रमाणे क्वालिटी उत्तर देऊ, असा सज्जड दमच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिला. सर्वपक्षीय बैठकीनंतर त्यांनी आज नॅशनल क्वालिटी कॉन्क्लेव्हमध्ये संवाद साधला.

राजनाथ सिंह म्हणाले, “भारताने कायम जबाबदार देश म्हणून संयमाने भूमिका निभावली आहे. चर्चेतून समस्या सोडवण्यावर आम्ही कायम भर दिला आहे. पण याचा अर्थ असा नाही की आमच्या सहनशीलतेचा कोणी गैरफायदा उचलेल. जर कोणी कधी अमच्या संयमाचा गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कालप्रमाणेच क्वालिटी कारवाईचा सामना करावा लागेल.”

संरक्षण सार्वभौमत्व

“काल केलेल्या कारवाईबद्दल आणि भारतीय लष्कराने दाखवलेल्या धैर्य आणि शौर्याबद्दल मी आपल्या सशस्त्र दलांचे अभिनंदन करतो. आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांना ज्या प्रकारे उद्ध्वस्त केले आहे ते आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. २०१४ मध्ये आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांनी आम्हाला एक अतिशय महत्त्वाचा सूत्र दिला. सुरुवातीलाच त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्राच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला. त्यांनी दिलेल्या सूत्रामागील तत्वज्ञान ‘संरक्षण सार्वभौमत्व’ होते”, असं राजनाथ सिंह म्हणाले.

Ordnance Factory चे कॉर्पोरेटायझेशन

“आमच्या सरकारने संरक्षण उत्पादनात गुणवत्ता आणि प्रमाण दोन्हीवर समान भर दिला आहे. या दिशेने अनेक क्रांतिकारी पावले उचलली गेली. संरक्षण उत्पादनात अल्पावधीत व्यापक सुधारणा घडवून आणण्यासाठी आम्ही केलेल्या सर्वात महत्त्वाच्या पावलांपैकी एक म्हणजे Ordnance Factorie कॉर्पोरेटायझेशन. मी तुम्हाला नक्कीच सांगू इच्छितो की Ordnance Factorieचे कॉर्पोरेटायझेशन ही आमच्यासाठी सोपी प्रक्रिया नव्हती. यामध्ये अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आणि आव्हाने होती, परंतु आम्ही ती तातडीची सुधारणा असल्याने ती अंमलात आणली”, असंही ते म्हणाले.

“सरकारने गुणवत्तेला प्राधान्य दिलं आहे. आम्ही केवळ गुणवत्ता सुधारणेला लक्ष्य ठेवून Ordnance Factorie कॉर्पोरेटीकरण केले. तेव्हापासून आजपर्यंत, संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांमध्ये सातत्याने सुधारणा झाली आहे आणि कॉर्पोरेटायझेशननंतर, दर्जेदार उत्पादन वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत”, असंही ते म्हणाले.