Maharashtra Women Dead Body Found In Suitcase In Bengaluru: बंगळुरूतील एका फ्लॅटमध्ये महाराष्ट्रातील ३२ वर्षीय तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला आहे. तरुणीच्या पतीला हत्येच्या संशयावरून महाराष्ट्रातून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित गौरी खेडेकरच्या पतीने घरमालकाला फोन करून फ्लॅटमध्ये त्याच्या पत्नीचा मृतदेह असल्याची माहिती दिली. त्यानंतर घरमालकाने पोलिसांना हा प्रकार कळवला.

आरोपी पती महाराष्ट्रातून ताब्यात

गौरी तिचा पती राकेश राजेंद्र खेडेकरबरोबर हुलीमावू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोड्डाकम्मनहल्ली परिसरातील अपार्टमेंटमध्ये राहत होती. राकेश एका खाजगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. दरम्यान बंगळुरू पोलिसांनी पती राकेश खेडेकरला महाराष्ट्रातून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

वॉशरूममधील सुटकेसमध्ये गौरीचा मृतदेह

नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर एक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचला होता. सुरुवातीला त्याला हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे वाटले होते, परंतु जेव्हा तो घटनास्थळी पोहोचला तेव्हा गौरीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळला. दरम्यान “फॉरेन्सिक विश्लेषकांना मृत तरुणीच्या शरीरावर चाकूने वार केल्याचे आढळले आहे,” असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेबाबत बोलताना बंगळुरूच्या (आग्नेय) पोलीस उपायुक्त सारा फतीमा यांनी, “महिलेचा मृतदेह वॉशरूममध्ये ठेवलेल्या सुटकेसमध्ये आढळला,” असे सांगितले.

गौरी आणि राकेशचे दोन वर्षांपूर्वी लग्न

मूळचे महाराष्ट्रातील असलेल्या राकेश आणि गौरी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ते फेब्रुवारी २०२५ मध्ये घटना घडली त्या घरात भाड्याने राहायला आले होते. गौरी गृहिणी होती आणि ती नोकरीच्या शोधात होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घरमालकाने संध्याकाळी ५.३० वाजता नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यावेळी त्यांना घराला कुलूप लावल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी घराचू कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना वॉशरूममध्ये सुटकेस आढळली. ज्यामध्ये गौरी खेडेकरचा मृतदेह होता.