अनैतिक संबंधातून अनेक गुन्हे घडतात. प्रियकराच्या मदतीने कट रचून पती हत्या केली जाते. पण पश्चिम बंगालमध्ये यापेक्षाही धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून पत्नने आपल्या पतीला किडनी विकायला सांगितली. पण किडनी विकून आलेल्या पैशांतून तिने जी कृती केलीय त्याची आता संपूर्ण राज्यभर चर्चा होतेय. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

पश्चिम बंगालमधील हावडा येथील एका महिलेने आपल्या पतीला मुलीला चांगलं शिक्षण मिळावं याकरता किडनी विकण्यास प्रवृत्त केलं होतं. ती वर्षभरापासून तिच्या पतीवर किडनी विकण्याकरता दबाव आणत होती. पत्नीच्या दाबावाला बळी पडून पतीने त्याची किडनी विकण्यास तयारी दर्शवली. त्यानुसार, त्याने शस्त्रक्रिया करून किडनी काढून टाकली अन् त्याबदल्यात या जोडप्याला १० लाख रुपये मिळाले. पतीला लवकर रिकव्हर होण्याकरता तिने त्याला आराम करण्याचा सल्ला दिला.

१० लाख रुपये पत्नी पसार

पण, काही वेळातच घरात ठेवलेली १० लाखांची रोखरक्कम घेऊन तीन घरातून निघून गेली अन् पुन्हा परतीलच नाही. घरातील तिजोरीत १० लाख रुपये नव्हे, असा आरोप तिच्या पतीने केला आहे. त्यामुळे त्याने तत्काळ यासंदर्भात पोलिसांना कळवलं. पोलीस आणि मित्रांच्या मदतीने तिला कोलकाता येथून शोधून काढलं. एका वर्षभरापूर्वी ती फेसबूकवर एका व्यक्तीला भेटली होती. त्याच्याबरोबर त्याची मैत्री होऊन नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ती १० लाख रुपये घेऊन त्याच्यासोबतच कर्नाटक येथे राहत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पती, सासू आणि मुलगी महिलेच्या घरी गेले असता तिने त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला. तिच्या कथित प्रियकराने त्यांना सांगितले की ती घटस्फोटासाठी अर्ज करणार आहे. तिच्या १६ वर्षांच्या वैवाहिक जीवनात सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ झाला असल्याचाही दावा करण्यात आला आहे. व्हिडिओ फुटेजच्या आधारे तपास करून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.