उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. संबंधित महिला ३ ऑगस्ट रोजी मंदिरात देवदर्शनासाठी गेली होती. त्यानंतर ती घरी परतत असताना तिच्याबरोबर अनर्थ घडला.

३ ऑगस्ट रोजी सायंकाळी मंदिरात देवदर्शन घेतल्यानंतर पीडित महिला रस्त्यावर उभं राहून बसची वाट पाहत होती. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य शेरू आणि झुबेर अहमद नावाची व्यक्ती चारचाकी वाहनातून पीडितेजवळ आले. त्यांनी पीडितेला सांगितलं की, आता कोणतीही बस मिळणार नाही. आम्ही तुला कारमधून तुझ्या घरी सोडतो. काळोख वाढत असल्याने पीडित महिला आरोपींच्या कारमध्ये बसली.

यानंतर आरोपींनी पीडितेला जंगलात नेलं आणि कार लॉक करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यावेळी पीडितेनं मदतीसाठी ओरडण्याचा प्रयत्न केला. पण आरोपींनी तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला, असं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.

हेही वाचा- हैदराबादमध्ये तरुणीचे कपडे फाडून भररस्त्यात केलं नग्न; प्लास्टिकच्या कागदाने झाकावं लागलं अंग, नराधमला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एवढंच नव्हे तर आरोपींनी बलात्काराचा व्हिडीओही रेकॉर्ड केला. तसेच घटनेची वाच्यता केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. शिवाय एकाने तिच्या डोक्यावर बंदूक ताणली आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याचीही धमकी दिली, असा दावा पीडितेनं केला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.