सामाजिक सोहळ्यात; तसेच सभांमधून नागरिकांना ख्रिस्ती धर्मप्रसार साहित्याचे वाटप केल्याबद्दल आणि धर्मातराचे तत्त्वज्ञान पसरवल्याच्या कारणावरून एका महिलेला न्यायालयाने तीन वर्षे सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. झेजियांग प्रांतातील झुजी शहरात राहणाऱ्या शोऊ गोईंग हिला स्थानिक न्यायालयाने ‘क्वानेनग्शेन’ म्हणजेच ख्रिस्ती धर्माचा प्रसार केल्याबद्दल ही शिक्षा सुनावली. या कार्यात तिचा महत्त्वाचा वाटा होता. धर्मप्रसाराच्या कार्यात काम करणाऱ्या संस्थांशी तिचा संपर्क आल्यानंतर सहा महिन्यांतच तिची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती, असे झिनुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. सार्वजनिक स्थळी ही महिला सातत्याने धर्माविषयी आपले विचार व्यक्त करत होती.
संग्रहित लेख, दिनांक 29th Aug 2014 रोजी प्रकाशित
चीनमध्ये धर्मप्रसार करणाऱ्या महिलेस तुरुंगवास
सामाजिक सोहळ्यात; तसेच सभांमधून नागरिकांना ख्रिस्ती धर्मप्रसार साहित्याचे वाटप केल्याबद्दल आणि धर्मातराचे तत्त्वज्ञान पसरवल्याच्या कारणावरून एका महिलेला न्यायालयाने तीन वर्षे सहा
First published on: 29-08-2014 at 12:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman get prison for spreading religion in china