इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजसह (INTACH) एका प्रकल्पांतर्गत वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाइन (WUD), सोनीपत, हरियाणा येथील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात असलेल्या एका पुरातन ठिकाणाचा शोध घेतला आहे. आपल्या संस्कृती आणि वारशासाठी ओळखले जाणारे धुबेला शहर लवकरच देशी तसेच विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तयार होणार आहे. शिवाय येथील स्थानिकांसाठी उत्पन्नाचा एक स्त्रोत म्हणून येत्या काळात हे गाव नावारुपाला येणार आहे.

असं म्हटलं जातं की, एखादा देश उत्कृष्ट कसा बनतो, हे त्या देशातील तरुण पिढीवर अवलंबून असते. त्याचाचं प्रत्यय WUD च्या विद्यार्थ्यांनी धुबेला शहराचा शोध घेत आणून दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग ३९वर असलेल्या ओरछा आणि खजुराहो या दोन शहरांप्रमाणेच पर्यटनायोग्य असूनही धुबेलाला अद्याप तो दर्जा प्राप्त झालेला नाही. मध्य भारतातील महान योद्ध्यांपैकी एक आणि महान महिला योद्धा मस्तानी बाई (बाजीराव पेशव्यांची दुसरी पत्नी) आणि महाराजा छत्रसाल यांचे महल धुबेला येथे आहे. तसेच या जागेला एक समृद्ध इतिहास आहे, ज्याबद्दल जास्त लोकांना फार माहिती नाही.

Israeli missiles hit site in Iran
Iran-Israel War : इस्रायलची इराणविरोधात कारवाई सुरू, न्यूक्लीअर साईट्स असलेल्या शहरात अनेक स्फोट
Tigress hunt crocodile with her cubs in rajasthan
राजस्थानच्या रणथंबोर उद्यानात शिकारीचा थरार; वाघीण आणि मगरीतील ‘चित्तथरारक लढाई’ VIDEO व्हायरल
Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Somalias Pirates Stock Market in Harardhere
वित्तरंजन : भांडवली बाजारच; पण कुणाचा?

द स्टेस्टमनने दिलेल्या वृत्तानुसार, धुबेला शहरामध्ये १७व्या शतकातील ऐतिहासिक महत्त्वाची अनेक स्मारके आहेत, ज्यात मस्तानी महलचा समावेश आहे. परंतु हा महल अद्याप संरक्षित करण्यात आलेला नाही. वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाईनच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी या महालाची माहिती लोकांना मिळावी म्हणून केवळ पुढाकारच घेतला नाही, तर धुबेलाच्या विकासासाठी एक निधी मिळवून देण्यासाठी एक योजना देखील तयार केली आहे.

या प्रदेशाच्या पर्यटन प्रोफाइलचा अभ्यास करून, WUD च्या विद्यार्थ्यांनी धुबेलाला भारतीय पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा महत्वाचा आणि प्रेरणादायी प्रयत्न केला आहे. त्यांच्या योजनेत त्यांनी अनेक अविभाज्य मुद्द्यांचा समावेश केला आहे. त्यामध्ये –

  • लाइट अँड साउंड शोचा परिचय, इव्हेंट्सचे आयोजन आणि स्मारकांच्या आतील तसेच बाहेरील जागेचा विकास करणे.
  • स्थानिकांच्या अर्थव्यवस्थेला आणि कलाकुसरीला चालना देण्यासाठी हेरिटेज झोनमध्ये स्ट्रीट मार्केटचा विकास करणे आणि हस्तकला केंद्र बांधणे.
  • मुलभूत पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मुख्य रस्ते सुधारणे, तलावातील गाळ काढणे आणि सर्व स्मारकांचे जीर्णोद्धार करणे
  • पर्यटन सुविधा सुधारण्यासाठी आणि वाढवण्यासाठी माहिती केंद्रे, हेरिटेज ट्रेल्स, विविध महत्त्वाच्या नोड्सवर रेस्टॉरंट्स आणि होमस्टेची निर्मिती करणे.
  • ओरछा आणि खजुराहोच्या सर्किटमध्ये धुबेला समाविष्ट करणे. प्रत्येक एमपी हॉटेल आणि माहिती केंद्रांमध्ये धुबेलाचा प्रचार करणारी माहितीपत्रके देऊन त्याची लोकांना ओळख करून देणे.
  • झाशी, ओरछा आणि खजुराहो यांसारखी प्रमुख रेल्वे स्थानके धुबेला ते जोडण्यासाठी आणि वाहतूक सुविधा वाढवण्यासाठी शेवटच्या अंतरावर जोडण्याची तरतूद.
  • सर्व स्मारकांपर्यंत सहज पोहोचता येण्याजोग्या रस्त्यांचा विकास, हेरिटेज ट्रेल्स, पादचाऱ्यांसाठी ट्रॅक, बग्गी राइड्स आणि इतर नॉन-मोटराइज्ड वाहनांसाठी स्वतंत्र रस्ते बांधणे.
  • धुबेला प्रवेशाचे सीमांकन करण्यासाठी बुंदेलखंडी डिझाइन घटकांचा वापर करून प्रवेशद्वार बांधणे, यांचा समावेश आहे.

या सर्व तरतुदींचा एक आराखडा या विद्यार्थ्यांनी तयार केला असून त्यानुसार येत्या काळात धुबेलाला देशातील पर्यटनाच्या नकाशावर आणलं जाणार आहे.