scorecardresearch

Flashback 2022 : सरत्या वर्षात जगभरात अनेक दिग्गजांचा मृत्यू, २०२२ मधील दिवंगत व्यक्तींचा आढावा…

२०२२ या वर्षात जगावर परिणाम करणारे दिग्गज लोक कोण होते याचा हा आढावा…

Flashback 2022 : सरत्या वर्षात जगभरात अनेक दिग्गजांचा मृत्यू, २०२२ मधील दिवंगत व्यक्तींचा आढावा…
Flashback 2022 : सरत्या वर्षात जगभरात अनेक दिग्गजांचा मृत्यू, २०२२ मधील दिवंगत नेत्यांचा आढावा… (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Year ender 2022: नववर्ष सरत्या वर्षातील अनेक आठवणींना मागे टाकतं. त्याप्रमाणे २०२३ च्या आगमनाच्या चाहुलीसह २०२२ हे वर्षही असंच मागे पडत चाललं आहे. मात्र, २०२२ मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा नववर्षाच्या पूर्वसंध्येला विचार केल्याशिवाय सोडता येणार नाही. यातील एक बाब म्हणजे या वर्षात मृत्यू झालेले जगभरातील दिग्गज. या पार्श्वभूमीवर २०२२ या वर्षात जगावर परिणाम करणारे दिग्गज लोक कोण होते याचा हा आढावा…

राणी एलिझाबेथ (दुसरी) यांचं निधन २०२२ मधील जगभरातील दिग्गजांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलं. एलिझाबेथ यांनी मागील ७० वर्षे ब्रिटनच्या राजघराण्याच्या प्रमुखपदावर विराजमान होऊन काम केलं. त्यांच्या निधनासह हा अध्याय संपला. मात्र, त्याआधी राणी एलिझाबेथ ब्रिटनमधील अनेक सामाजिक बदलांच्या साक्षीदार राहिल्या. इतकंच नाही, तर अनेक कौटुंबिक भूकंपांचाही त्यांनी सामना केला. ब्रिटनमध्ये बहुतांश नागरिकांनी पाहिलेली राणी म्हणूनही एलिझाबेथ यांचं ओळख आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये झालेलं राणी एलिझाबेथ यांचं निधन या वर्षातील सर्वात ‘हाय प्रोफाईल’ व्यक्तीचं निधन मानलं गेलं.

याशिवाय २०२२ मध्ये निधन झालेल्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये सोविएत नेते मिखाईल गॉर्बाचेव्ह यांचाही समावेश आहे. त्यांचा मृत्यू ऑगस्ट २०२२ मध्ये झाला. शीतयुद्ध संपवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. २०२२ मध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या केल्याचीही घटना घडली. जुलै २०२२ मध्ये एका ठिकाणी भाषण देत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला होता.

अमेरिकेतील मेडलिन अलब्राईट राज्याचे माजी सचिव, माजी उत्तर आर्यलंडचे पहिले पंतप्रधान डेविड ट्रिंबल, चीनचे माजी अध्यक्ष जियांग झेमिन, युक्रेनचे माजी अध्यक्ष लिओनिड क्रॅव्हचूक, मेक्सिकोचे माजी अध्यक्ष लुईस एचव्हरिया, पेरूचे माजी अध्यक्ष फ्रान्सिस्को मोरालेस बर्मुडेज, क्युबाचे रिकार्डो अलरकॉन अशा अनेकांचंही २०२२ मध्येच निधन झालं.

हेही वाचा : Flashback 2022: धक्कादायक एक्झिट! ‘या’ वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनेक दिग्गजांनी घेतला जगाचा निरोप

२०२२ मध्ये निधन झालेल्या मनोरंजन क्षेत्रातील लोकांमध्ये प्रसिद्ध गायक लता मंगेशकर यांच्यासह जगभरातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. लता मंगेशकर यांचं ६ फेब्रुवारी २०२२ रोजी झालं. दिग्दर्शक जीन-लुक गोडार्ड; चित्रपट निर्माता इव्हान रीटमन, व्हिज्युअल आर्टिस्ट पॉला रेगो आणि कारमेन हेरेरा, फॅशन डिझायनर इस्सी मियाके आणि हाना मोरी, फॅशन एडिटर आंद्रे लिओन टॅली, कंट्री सिंगर लोरेटा लिन आणि नाओमी जुड, रॉक स्टार मीट लोफ, फ्लीटवुड मॅक सिंगर क्रिस्टीन मॅकवी अशा अनेकांचंही याच वर्षात निधन झालं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 10:34 IST

संबंधित बातम्या