पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशातील जनतेचं किती प्रेम आहे हे निकालावरुन स्पष्टच झालंय. पण, बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात एक वेगळीच घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने मोदींच्या विजयानंतर आनंदात चक्क स्वतःच्या छातीवर चाकूने मोदींचं नाव कोरलं. हे करताना बराच रक्तस्त्राव देखील झाला, तसंच मोदींच्या या ‘फॅन’ला पाहण्यासाठी बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनू पटेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या जबरा फॅनचं नाव आहे. तो मोतिहारीच्या तुरकौलिया परिसरातील रहिवासी आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, सोनू पटेल चाकूने छातीवर मोदींचं नाव कोरत असताना बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मतमोजणीला सुरुवातीचे कल येताच सोनूने तेथे उपस्थित नागरीकांना मिठाई देखील वाटली होती. पण भाजपाचा विजय निश्चित झाल्यावर केवळ मिठाईवरच तो थांबला नाही.  तर त्याने थेट चाकूने रक्तस्त्राव होत असतानाही हसत-हसत स्वतःच्या छातीवर मोदींचं नाव कोरलं. याबाबत बोलताना, ‘मोदी देशाचे भविष्य आहेत. जर मोदी देशासाठी बलिदान द्यायला तयार आहेत, तर मी देखील त्यांच्यासाठी माझा जीव देऊ शकतो. मोदी माझ्यासाठी देव आहेत’, असं सोनू म्हणाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth uses knife to carve pm narendra modis name on his chest in bihar after loksabha election results
First published on: 26-05-2019 at 10:36 IST