पर्मनंट अकाऊंट नंबर म्हणजे पॅनकार्ड. भारतीय आयकर विभागाकडून पॅन कार्ड दिले जाते. विविध आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डची गरज लागते. व्यक्ती आणि कंपनीच्या नावाने पॅन कार्ड जारी केले जाते. आयकर खात्याकडून ई-पॅन कार्डही जारी केले जाते. हे इले्क्ट्रॉनिक पद्धतीचे पॅन कार्ड असते. ज्यांना इन्कम टॅक्स भरायचा आहे. त्यांच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार करताना पॅन कार्ड बंधनकारक आहे.

पॅन कार्डमध्ये जे नाव नोंदवलेले असते त्यामध्ये काही चुका झाल्यास पुढे अडचणी निर्माण होतात. अशा वेळी झालेल्या चुका दुरुस्त करणे फारसे कठिण नाही. ही खूप सोपी प्रक्रिया आहे.

bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
IPL Star RCB Cameron Green 60 Percent Working Kidney Tells diet to control
६० टक्के कार्यरत किडनीसह IPL खेळतोय RCB चा ‘हा’ स्टार खेळाडू; किडनीच्या सुदृढतेसाठी काय खावं, काय नाही?
Can weight loss drugs prevent heart attacks
वजन कमी करण्याचे हे औषध हृदयविकाराचा झटका टाळू शकते का? Semaglutide बाबत काय सांगतात डॉक्टर?
knee pain
गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी आशेचा किरण! पूर्ण गुडघ्याऐवजी फक्त घर्षण झालेला भाग बदलून उपचार

पॅन कार्डमध्ये मी माझे नाव कसे दुरुस्त करु शकतो ?

१) पॅन कार्डमध्ये नाव बदलण्यासाठी तुम्हाला या संकेतस्थळावर https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html जावे लागेल. तिथे जाऊन ‘Apply Online’ हा पर्याय निवडा.

२) ‘Application Type’ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बदल किंवा दुरुस्ती म्हणजे ‘changes or correction in existing PAN Data/ Reprint of PAN Card (No changes in existing PAN data) हा पर्याय दिसेल. त्यानंतर शेजारच्या कॅटेगरीवर क्लिक करुन ‘Individual’ हा पर्याय निवडा. त्यानंतर त्याच ‘Apply Online’ फॉर्ममध्ये टायटल, तुमचे नाव/आडनाव, जन्मतारीख, ईमेल आयडी, पॅन नंबर, नागरीकत्व, कॅपचा कोड याची सर्व माहिती भरुन ‘सबमिट’ बटन क्लिक करा.

३) सर्व माहिती भरुन दिल्यानंतर एनएसडीएलची ऑनलाइन पॅन अॅप्लिकेशन सेवा वापरल्याबद्दल आभार मानणारा एक मेसेज तुम्हाला कॉम्प्युटरवर दिसेल. तुमच्या अर्जाची नोंद झाल्याचा तुम्हाला एक टोकन नंबर दिसेल. पॅन अ‍ॅप्लिकेशनमध्ये तुम्ही जो ई-मेल आयडी दिला असेल, तिथे सुद्धा असाच संदेश जाईल. त्यानंतर उर्वरित पॅन अॅप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी Continue with PAN Application Form वर क्लिक करा.

४) पॅन कार्डमध्ये नाव दुरुस्तीसाठी ‘Apply Online’ फॉर्म भरताना आधार कार्डावर असलेले नाव टाकावे लागेल. तुम्हाला फोटो, स्वाक्षरी बदलायची असेल तर, फोटो मिसमॅच, स्वाक्षरी मिसमॅच हे ऑप्शन्स क्लिक करावे लागतील. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही ‘नेक्सट’वर क्लिक करा. तिथे तुम्हाला तुमचे बदल नोंदवून घेतल्याची एक स्लीप मिळेल.