01 June 2020

News Flash

PF खात्यावर दोन लाख असतील तर किती रक्कम काढू शकता? पाहा नियम

पीएफ खात्यावरील रक्कम अवघ्या दोन-तीन दिवसांच्या कार्यालयीन वेळेत काढता येते.

करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोट्यवधींच्या नोकऱ्यावर गेल्या आहेत. अनेक कंपन्या डबघाईला आल्याचे चित्र आहे. परिणामी अनेकांचा पगार कापले जात आहेत. तर अनेकांना कामावरून बडतर्फ करण्यात येत आहे. नोकरी नसल्यामुळे घरखर्च भागवण्यासही काहीकडे पैसा नसेल. सरकार यातून सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून सर्वोत्परीने मदत करत आहे. याच धर्तीवर केंद्र सरकारने पीएफ खात्यावरील काही रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे काहींना दिलासा मिळाला आहे. मात्र, पीएफ खात्यावरील रक्कम किती आणि कशी काढायची याबाबत अनेकजणांना माहिती नाही.

आणखी वाचा : या सोप्या पद्धतीनं तपासा PF बॅलन्स

पीएफ खात्यावरील रक्कम अवघ्या दोन-तीन दिवसांच्या कार्यालयीन वेळेत काढता येते. जाणून घेऊयात त्याचे नियम अटींबद्दल.. समजा तुमच्या पीएफ खात्यावर दोन लाख रूपये आहे. या संकटात तुम्ही त्यामधील किती रक्कम काढू शकता आणि त्याची पद्धत काय आहे…

पीएफ खात्यामधून एकूण रकमेच्या ७५ टक्के रक्कम किंवा तीन महिन्याच्या पगार, यापैकी जी रक्कम कमी असेल ती तुम्ही काढू शकता. पीएफ खात्यातील पैसे काढण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर फक्त तुम्ही एकदाच पीएफ खात्यातून रक्कम काढू शकता.

आणखी वाचा : २५ हजारांच्या बेसिक पगारातही होऊ शकता कोट्यधीश, जाणून घ्या कसं 

समजा तुमच्या पीएफ खात्यावर दोन लाख रूपये जमा आहेत. ७५ टक्केंच्या नियमांनुसार तुम्ही एक लाख ५० हजार रूपये काढू शकता. पण तुमचा महिन्याचं बेसिक वेतन + डीए ३०, ००० रूपये आहे. तीन महिन्याचा तूमचा एकूण पगार ९० हजार रूपये होतोय. तुमचा तीन महिन्याचा पगार पीएफ खात्यातील रकमेच्या ७५ टक्केंपेक्षा कमी आहे. त्यामुळे तुम्ही नियमांनुसार ९० हजार रूपये काढू शकता. तसेच तुमचा बेसिक पगार + डीए ४० हजार असेल तर तुम्ही पीएफ खात्यातून एक लाख २० हजार रूपयांची रक्कम काढू शकता.

आणखी वाचा : घरबसल्या काढा PF मधील रक्कम, तीन दिवसांत जमा होईल खात्यावर

तेव्हा पगार नव्हे ७५ टक्के रक्कम काढू शकता : तुमचा मासिक वेतन + डीए ५५ हजार रूपये आहे. त्यानुसार तीन महिन्याचा तुमचं एकूण वेतन एक लाख ६५ हजार रूपये होतं. नियमांनुसार, तुम्हाला पीएफ खात्यातून एक लाख ५० हजार रूपये काढता येतील. कारण, तुमचा तीन महिन्याचा पगार पीएफ खात्यातील ७५ टक्केंच्या रक्कमेपेक्षा जास्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2020 2:19 pm

Web Title: provident fund balance withdrawal rules what you could withdraw if you have 2 lakh rupees nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 नोकरी गेली तरी घाबरु नका; मोदी सरकारने आणली नवी योजना, २ वर्ष मिळणार पैसे
2 Summer Health Tips: जाणून घ्या पाणी का प्यावे, कसे प्यावे आणि किती प्यावे
3 जाणून घ्या कधी आहे मदर्स डे, कशी झाली आईला सन्मान देणाऱ्या दिवसाची सुरुवात
Just Now!
X