News Flash

ऑनलाइन धोक्यांपासून स्वत:ला असं ठेवा दूर, या आहेत सोप्या टिप्स 

सायबर गुन्ह्याला असा घाला आळा...

– रवी गोयल   
करोना महामारीमध्ये दोन बाबतीतील सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. पहिली म्हणजे तुमचे आरोग्य आणि दुसरे म्हणजे तुमची डिजिटल सुरक्षा. करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सरकार आणि RBI आणि NPCIसारख्या नियामक संस्था शक्य तिथे ग्राहकांनी डिजिटल पेमेंट्सचा पर्याय वापरावा यासाठी प्रोत्साहन देत आहेत. भारतातील सध्याच्या पेमेंट परिसंस्थेत पेमेंटच्या डिजिटल माध्यमांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. उदा. क्रेडिट कार्ड्स आणि क्रेडिट कार्डांसोबतच ई-वॉलेट्स, BHIM UPI, पेमेंट गेटवेज, NFET/IMPS/RTGS.

लॉकडाउनमध्ये डिजिटल पेमेंट्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि त्यासोबतच गैरव्यवहारांमध्येही. भारतासह जगात अनेक ठिकाणी करोनामुळे निर्माण झालेल्या गोंधळाचा, चिंतेचा गैरवापर करून स्कॅमर्स वैयक्तिक आणि बँकिंगसंदर्भातील माहिती मिळवत आहेत. मुंबई मेट्रोपोलिटन रीजन (एमएमआर)च्या सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार २०१९ मधील जानेवारी ते मे या काळाच्या तुलनेत २०२० सालात याच पाच महिन्यांच्या काळात सायबरसंबंधी गुन्ह्यांमध्ये ७० टक्के वाढ झाली आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून पोलिसांकडे सायबर गुन्ह्यांच्या दररोज सरासरी १२ तक्रारी येत आहेत. क्रेडिट आणि डेबिट कार्डांच्या गैरव्यवहारांसह अन्य सायबर गुन्ह्यांमध्ये मुंबईत १९ टक्के तर महाराष्ट्रात ५१ टक्के वाढ झाली आहे. बहुतांश आघाडीच्या बँकांनी आपल्या आधीच्या प्रोसेसिंग प्रणालीला गैरव्यवहारांवर देखरेख ठेवणाऱ्या रीअल-टाईम प्रणालीची जोड दिलेली आहेच. मात्र, काही साध्यासोप्या उपायांमुळे ग्राहक स्वत:च सायबर गुन्ह्यांचे हे गैरव्यवहार रोखण्यात मोठा सहभाग देऊ शकतील. जाणून घेऊयात कशी रोखता येईल सायबर गुन्हेगारी…

सजग रहा :

नियमनांमध्ये झालेले बदल आणि प्रत्यक्ष व्यवहारांवरून डिजिटल प्रणालीकडे झालेला बदल यामुळे बँका तसेच पेमेंट अॅप्लिकेशन्स आपल्या ग्राहकांना सतत संदेश पाठवत असतात. त्यामुळे आपल्या बँकेकडून आलेले संदेश नेहमी नीट वाचा आणि नियमांची अमलबजावणी किंवा या क्षेत्रातील कोणत्याही बदलाची माहिती जाणून घेण्यासाठी बँकेशी संपर्क साधा. भारतात RBI, NPCI, रुपे, मास्टरकार्ड आणि व्हिसातर्फे पेमेंटच्या सुरक्षित प्रणाली उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.

फिशिंगपासून सावधान :

तुम्हाला ज्यांच्याशी व्यवहार करायचा आहे त्या व्यक्ती किंवा संस्थेची अधिकृत वेबसाइट, ईमेल अॅड्रेस, फोन क्रमांक आणि सोशल मीडिया हँडल्स नीट तपासा. कोणत्याही प्रकारची शंका असल्यास तुम्हाला आलेल्या ईमेलमधील डोमेन नेम तपासून तुम्ही त्यातील सत्यता पडताळू शकता. अनेक गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी आरोग्य संस्था किंवा वित्त संस्थेच्या अधिकृत वेबसाइटची नक्कल करतात. त्यामुळे, सतत सजग असणे फार महत्त्वाचे आहे. कोविड-19 शी संबंधित कोणताही ईमेल फार दक्षतापूर्वक हाताळायला हवा, विशेषत: एखाद्या सर्वेक्षण किंवा दान करण्याबाबत असेल तर. त्याचप्रमाणे, तुमची ऑपरेटिंग सिस्टम, तुमचा अँटीव्हायरस प्रोग्राम आणि अधिकृत अॅप्स नेहमी अपडेट करा. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी नवे सुरक्षा पर्याय तुम्हाला उपलब्ध होतील.

कशावरही विश्वास ठेवण्यापूर्वी संशोधन करा :

जगभरातील नागरिकांना नवनवीन माहिती मिळवायची असते. त्यामुळे, ही अस्थिरता वाढवण्यासाठी हल्लेखोर कोरोनाच्या डॅशबोर्डचा वापर करतात. चेक पॉईंट रीसर्च या सायबरसेक्युरिटी फर्मच्या अहवालानुसार कोरोनाच्या संकल्पनेवर आधारित डोमेन्स बनावट वा धोकेदायक असण्याची शक्यता 50 टक्के अधिक असते. त्यामुळेच, विशिष्ट डॅशबोर्डवर कोणत्याही क्रमांकावर विश्वास टाकताना आधी विश्वासार्ह आणि विश्वसनीय स्रोत असल्याची खातरजमा करून घ्या.

ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती कुणालाही देऊ नका –

डेबिट आणि क्रेडिट कार्ड क्रमांक, पीन, एक्स्पायरीची तारीख, सीव्हीव्ही क्रमांक, बँक खात्याची माहिती, ओटीपी इत्यादी माहिती कधीही कुणालाही देऊ नये. इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड, एटीएमचे पिन कुठेही लिहून ठेवण्याऐवजी, फोनमध्ये ठेवण्याऐवजी लक्षात ठेवण्यावर भर द्या. कोणत्याही संशयास्पद व्यवहारासंदर्भात तुमच्या बँकेला कळवा किंवा अनधिकृत व्यवहारांची माहिती द्या.

पासवर्ड स्ट्राँग ठेवा :

पासवर्ड स्ट्राँग निवडा, शिवाय तो फार सामान्य किंवा चटकन अंदाज लावण्यासारखा नसावा. तुमचे नाव, आडनाव, जन्मतारीख न वापरणे, स्पेशल कॅरेक्टरचा वापर, अपर आणि लोअर केसचा वापर, अल्फा आणि आकड्यांच्या चिन्हांचा वापर अशा पासवर्ड बनवण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वांचा वापर करा. मीडिया अहवालानुसार जगभरातील  23 दशलक्ष अकाऊंट्सचे उल्लंघन निव्वळ त्यांचा पासवर्ड 123456 असा असल्याने झाले आहे. तसेच, तुमचा पासवर्ड वारंवार बदलण्याची सवय लावून घ्या. इतकेच नाही, आवश्यक तिथे विविध टप्प्यांमधील प्रमाणीकरण (ऑथेंटिकेशन) हा पर्याय निवडावा. त्यामुळे तुमच्या खात्याला अधिक सुरक्षितता लाभते.

साध्या डिजिटल पद्धतींमध्ये विश्वासार्ह आयएसपी आणि प्रशंसित अँटिव्हायरस प्रोग्राम निवडणे, सार्वजनिक वायफायचा वापर टाळणे, विश्वासार्ह आणि माहितीतील व्यापाऱ्यांच्या आणि संस्थांच्या वेबसाइटवरूनच खरेदी करणे, अनोळखी वेबसाइटवर क्लिक न करणे, संशयास्पद व्यवहारांच्या संदर्भात तुमच्या बँकेला, इन्शुरन्स कंपनीला लगेच माहिती देणे अशा उपाययोजनांचाही समावेश आहे.

( लेखक AGS Transact Technologies कंपनीचे एमडी आणि चेअरमेन आहेत) 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 12:46 pm

Web Title: tips avode online fraud scammers are tricking users upi online scame nck 90
Next Stories
1 दररोज ११४ रुपये गुंतवा अन् मिळवा २६ लाखांचा परतावा
2 International Coffee Day: बकऱ्यांचं विचित्र वागणं, गोंधळलेला धनगर अन् ‘सैतानाचे काम’… असा लागला कॉफीचा शोध
3 Timeline: राम मंदिर-बाबरी मशीद वादाचा इतिहास, जाणून घ्या नक्की काय घडलं होतं
Just Now!
X