जगातील विविध धर्माचे लोक वेगवेगळे सण साजरे करतात. यातील काही सण साजरे करण्याच्या पद्धती काहीवेळा आपल्यासाठीही फार नवीन असतात. पण, जगभरात काही देशांमध्ये काही सण इतक्या भयानकपणे साजरे केले जातात हे पाहून तुम्हालाही धडकी भरेल, त्यांची काही विशिष्ट सण साजरे करण्याची परंपरा इतकी भयानक असते की, ज्यात लोकांचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. तरीही वर्षानुवर्षे हे सण साजरे होत आहेत. आज आपण जगातील अशाच पाच धोकादायक सणांविषयी जाणून घेणार आहोत.

१) पेरू : ख्रिसमस फायटिंग फेस्टिव्हल

दरवर्षी २५ डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला जातो. पण, पेरूमध्ये एक वेगळीच प्रथा आहे, जिथे ख्रिसमस येताच लोक आपापसात भांडायला लागतात. सणासुदीच्या दिवशी कोण मारामारी किंवा भांडण करते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, पण पेरूच्या चुंबिविल्कास प्रांतात अशी परंपरा आहे की, लोक एकमेकांवर स्क्वॅश फेकतात आणि भांडायला सुरुवात करतात.

Everything You Need To Know About Pune Famous Tourist place sarasbag history name and many more
पुण्यातील प्रसिद्ध ‘सारसबाग’ कोणी बांधली? पाहा काय आहे इतिहास…
aditi sarangdhar shares private ride bad experience
Video : “अतिशय घृणास्पद, लाजिरवाणा प्रकार”, खासगी कारचालकावर ‘वादळवाट’ फेम अदिती सारंगधर संतापली, म्हणाली…
What is the hottest place on earth
पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण कोणते आहे? येथे माणूस राहू शकतो का? जाणून घ्या येथे किती आहे तापमान?
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप

पेरूच्या चुंबिविल्कास प्रांतात ख्रिसमसच्या दिवशी ताकानाकुय नावाचा सण साजरा केला जातो. मारामारी, भांडणाव्यतिरिक्त खाणे, पिणे, संगीत आणि नृत्यदेखील केले जाते. या उत्सवात ज्या लोकांच्या मनात १२ महिन्यांपासून जो काही राग आहे तो आपापसात भांडूण काढला जातो. यावेळी लोक हाताभोवती कापड गुंडाळून आपापसात मारामारी करतात. यादरम्यान एक रेफरीदेखील नियुक्त केला जातो, जो रंगीबेरंगी स्की मास्क घालतो आणि कोणालाही गंभीर दुखापत होणार नाही याची काळजी घेतो. एक व्यक्ती हरली की मारामारी संपते. यावेळी मारामारी करणारे, ती पाहणारे प्रेक्षक स्थानिक लोककथांवर आधारित पोशाख परिधान करून उत्सवाला उपस्थित राहतात.

२) ग्रीस रुकेटोपोलेमोस (रॉकेट वॉर)

जगातील सर्वात धोकादायक सण ग्रीसमध्ये साजरा होतो. हा सण अशाप्रकारे साजरा केला जातो की, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू होतो. ग्रीसमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या या सणाला रुकेटोपोलेमोस म्हणून ओळखले जाते. या दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये घनघोर युद्ध होत असते. हे पाहून तुम्हालाही धक्का बसेल, मृत्यूला आमंत्रण देणारा हा सण दरवर्षी इस्टरला व्रॉन्टाडोस या ग्रीक गावात साजरा केला जातो. या सणातील प्रथा असामान्य आणि धोकादायक म्हणून गणल्या जातात. या सणादरम्यान दोन प्रतिस्पर्धी चर्च (Agios markos आणि Panagia Erythiani) यांच्यात धोकादायक रॉकेट युद्ध होते. यामध्ये ६० हजारांहून अधिक रॉकेट दोन्हीकडून चर्चेवर डागले जातात. यावरून तुम्ही धोक्याचा अंदाज लावू शकता. या युद्धात लहान रॉकेटचा वापर केला जात असला आणि हे युद्ध खोटे असले तरी दरवर्षी यात अनेक लोकांचा मृत्यू होतो, त्यामुळे जगातील धोकादायक सणांमध्ये याची गणना होते.

३) स्पेन : बेबी जम्पिंग

एखाद्याच्या घरी मूल जन्माला आले की, आजूबाजूचे लोक, नातेवाइक आणि इतर बरेच लोक त्यांचे अभिनंदन करतात. मुलाला सुंदर भेटवस्तू दिल्या जातात, अनेक ठिकाणी कुटुंबातील सदस्य पार्ट्याही करतात, परंतु स्पेनमध्ये मुलाच्या जन्मानंतर एक विचित्र परंपरा पाळली जाते. स्पेनमध्ये एल कोलाचो नावाचा सण साजरा केला जातो, याला बेबी जम्पिंग किंवा डेव्हिल जम्पिंग फेस्टिव्हल असेही म्हणतात. जवळपास ४०० वर्ष जुन्या परंपरेनुसार, नवजात मुलांना त्यांच्या माता रस्त्यावर पसरलेल्या बेडवर झोपवतात. यावेळी काही लोक लाल आणि पिवळ्या रंगाचे विशेष प्रकारचे कपडे परिधान करतात, त्यापैकी एक सैतान मानला जातो, जो मुलांवर उडी मारतो किंवा त्यांच्यावरून उडी मारतो,

हा पारंपरिक स्पॅनिश उत्सव १६०० मध्ये सुरू झाल्याचे सांगितले जाते. स्पेनच्या बुर्गोसमधील सासामोन या गावात कॅस्ट्रिलो डी मर्सिया या छोट्या शहरात दरवर्षी हा सण साजरा केला जातो. पण, सणाला अद्याप कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.

४) इंग्लंड – चीज रोलिंग

एका शतकाहून अधिक काळ इंग्लंडमधील ग्लुसेस्टरशायरमध्ये एका विचित्र स्पर्धेचे आयोजन केले जाते. दोन दिवसीय महोत्सवात कूपर्स या उंच टेकडीवरून डबल ग्लूसेस्टर चीजचे रोल फेकले जातात. यानंतर स्पर्धेत सहभागी लोक उंच टेकडीवरून त्याचा पाठलाग करत ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. या स्पर्धेला चीज रोलिंग चॅलेंज म्हणतात. सर्वप्रथम जो स्पर्धक टेकडीच्या पायथ्याशी असलेली फिनिश लाइन क्रॉस करत चील रोल आणून देईल तो विजेता ठरतो. डोंगर उतारावरून चीज रोल पकडताना अनेक जण गंभीर जखमी होतात. पण, तरीही स्थानिक लोकांना त्यांच्या पारंपरिक स्पर्धेविषयी खूप अभिमान आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी हजारो लोक येत असतात. अनेकदा ही स्पर्धा थांबवण्याचा प्रयत्न झाला, परंतु ती वर्षानुवर्षे सुरूच आहे.

५) इटली : बॅटल ऑफ ऑरेंज

इटलीतील इव्हिया हे शहर त्याच्या खास उत्सवासाठी प्रसिद्ध आहे, ज्याचे नाव ‘बॅटल ऑफ ऑरेंज’ आहे. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये साजरा होणारा हा उत्सव इटलीतील लोकांसाठी केवळ सण नसून एक परंपरा आहे. १२ व्या शतकात ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. एकमेकांवर संत्री फेकून सण साजरा केला जातो. लोक दोन गटांत विभागले जातात आणि मग ते दिवसभर एकमेकांवर संत्री फेकतात. पराभव करण्याच्या प्रयत्नात सुमारे पाच लाख संत्री फेकली जातात.

हा रोमांचक उत्सव पाहण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी दरवर्षी दहा लाखांहून अधिक पर्यटक इव्हियाला प्रवास करतात. या महोत्सवात तबला, संगीत आणि नृत्यही होतात. इटली आणि युरोपच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात.