सध्या देशभरात तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. सध्या सर्वत्र उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्यासारखे वातावरण आहे. सकाळी १० च्या नंतर रस्त्यावर चालताना सुद्धा उन्हाच्या झळा लोकांना बसत आहेत. मात्र अजून खरा उन्हाळा चालू होयचा आहे असे म्हणायला हरकत नाही. मात्र या उन्हाळ्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी अनेक नागरिक घरामध्ये AC , Cooler अशी साधने बसवतात. ज्यापासून तुम्हाला गार वारा मिळतो आणि कडक उन्हापासून दिलासा मिळतो.

अनेक लोकांनी एसी , कूलर अशा वस्तूंची खरेदी सुरु केली आहे. ज्यांच्याकडे आधीपासूनच एसी, कूलर अशा वस्तू आहेत ते लोकं त्यांची साफसफाई किंवा सर्व्हिसिंग करून घेत आहेत. जेणेकरून उन्हाळ्यात काही त्रास होऊन नये. मात्र अशी अनेक लोकं आहेत की ज्यांना या सीझनमध्ये आपल्या एसी ,कुलरचे सर्व्हिसिंग करणे शक्य होत नाही आणि त्यामुळे तुमची एसी असलेली खोल व्यवस्थिपण गार होत नाही. आज आपण तुमच्या एसीचे कूलिंग कसे वाढवायचे ज्यामुळे तुमची खोली लवकरात लवकर गार होऊ शकेल हे जाणून घेऊयात.

हेही वाचा : मोठी बातमी! Infosys चे अध्यक्ष मोहित जोशी यांचा राजीनामा, आता ‘या’ कंपनीचे असणार सीईओ

जर का तुम्ही तुमच्या AC चा फिल्टर खूप कालावधीपासून साफ केलेला नसेल तर एसीचे कूलिंग देखील कमी होते. याचे कारण म्हणजे एसीच्या फिल्टरमध्ये घाण साचते. घाण साचल्यामुळे बाहेरून येणार हवेचा स्पीड कमी होतो. या कारणामुळे तुमची खोली लवकर गार होत नाही. तुम्ही एसीचा फिल्ट साफ केला की तुम्हाला लगेचच एसीच्या कुलिंगमधील फरक दिसून येईल.

स्प्लिट एसीमध्ये एसीचा एक भाग घराच्या आतील बाजूला असतो व कंडेन्सर कॉईल असलेला भाग हा घराबाहेर असतो . यामुळे तुमच्या खोलीतील गरम हवा ही खोलीच्या बाहेर जात असते. हा भाग बाहेर असल्याने त्यातही धूळ किंवा माती बसते. कधी -कधी पक्षी आपली घरटी तिथे बांधतात. यामुळे यामुळे कंडेन्सर कॉइल खोलीतील गरम हवा योग्य प्रकारे बाहेर टाकत नाही आणि खोली लवकर थंड होत नाही. कंडेन्सर कॉइल साफ करण्यासाठी तुम्ही ब्रश किंवा पाण्याच्या स्प्रेची मदत घेऊ शकता. कंडेन्सर कॉइल साफ केली तुमच्या एसीचे कूलिंग लगेच वाढेल व खोली देखील लवकर गार होईल.

हेही वाचा : मोटोरोलाने लॉन्च केला Moto G73 5G स्मार्टफोन, ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि…

कधी कधी लाईटचे व्होल्टेज हे कमी-जास्त होत असते. याचा परिणाम तुमच्या एसीच्या मोटरवर होतो आणि त्यामुळे तुमची खोली लवकर गार होत नाही. जर तुमच्या एसीचा फिल्ट आणि इतर गोष्टी व्यवस्थित काम करत असतील, तर तुम्ही एसी मोटर चेक करून घेणे आवश्यक आहे. याशिवाय, तुम्ही एसीचा थर्मोस्टॅट आणि कंप्रेसर देखील तपासला पाहिजे. कधीकधी त्यांच्यामध्ये काही दोषांमुळे खोली लवकर गार होत नाही. तसेच जेव्हा तुम्ही एसी सुरु करता तेव्हा तुमच्या खोलीचे दार आणि खिडक्या बंद करायला विसरू नका.