Apple’s iPhone: आयफोन खरेदी करणे हे काही महिन्यांपूर्वी पर्यंत प्रचंड श्रीमंतीचे व चैनीचे मानले जात होते. मात्र यंदा ऍपलने iPhone १४ व iPhone १४ प्रो मॅक्स लाँच केल्यावर बाकीच्या व्हेरियंतची किंमत बरीच खाली आली. याशिवाय मध्यंतरी अमेझॉन, फ्लिपकार्टवर सुद्धा iPhone वर अनेक डिस्काउंट ऑफर देण्यात आल्या होत्या यामुळे अनेकांच्या हातात आता iPhone पाहायला मिळतो. iPhone चे फीचर्स जाणून घेण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो, विशेषतः जर तुम्ही अँड्रॉइडवरून iPhone वापरायला सुरु केलं असेल तर सवय व्हायला वेळ लागते. हळूहळू तुम्हाला एक एक फीचर समजून घेता येईल पण इतक्या वर्षात एका प्रश्नाचे उत्तर मात्र अनेकांना माहिती नव्हते ते म्हणजे iPhone मध्ये i चा अर्थ काय?

मुळात iPhone निर्माती कंपनी Apple आहे. याशिवाय iMac, iPod, iTunes, iPad मध्ये सुद्धा ‘i’ आहे. १९९८ मध्ये Apple च्या एका इव्हेंट मध्ये स्टीव्ह जॉब्स यांनी iMac ची सुरुवात केली होती. स्टीव्ह जॉब्स ने सांगितले की, iMac मधील आय इंटरनेट साठी वापरला जातो.

जॉब्स यांनी सांगितले की, ‘i’ चा अर्थ केवळ इंटरनेट नाही. आम्ही एक संगणक कंपनी आहोत, आणि जरी हे उत्पादन नेटवर्कसाठी जन्माला आले असले तरी ते एक सुंदर स्वतंत्र उत्पादन आहे. आम्ही ते शिक्षणासाठी देखील लक्ष्य करत आहोत. त्यामुळे इंटरनेट शिवाय, Apple च्या प्रोडक्ट्सचा अर्थ व्यक्ति विशेष (individual), शिकवणे (instruct), सूचना (inform) आणि प्रेरणा (inspire) असाही अर्थ होतो.

हे ही वाचा<< …तर महिलांना रेल्वेचे टीसी तिकीट विचारू शकत नाही! तिकीट नसल्यास किती रुपये दंड आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१४ च्या सप्टेंबरमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान, Apple ने आपले पहिले स्मार्टवॉच आणि मोबाइल पेमेंट सिस्टम सुरु केली होती. कंपनीने “iPay,” “iWatch,” “iWallet” आणि अशाच प्रकारच्या उत्पादनांची नावे देताना “i” ब्रँडिंगचा विचार केला होता.