जगभरात जास्तीत जास्त मृत्यू हे रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमुळे होतात. डोंगरभागात आणि घाटरस्त्यात नागमोडी वळणांमुळे अपघात होत असतात. धोकादायक वळणावरून चालक कशाप्रकारे गाड्या चालवतात, याचा तुम्हालाही प्रवास करताना कधीतरी अनुभव आला असेल. कधी कधी चालकाच्या अतिघाईमुळं समोरून येणाऱ्या गाडीचा अपघात होता आणि भयंकर घटना घडते. हॉर्न वाजवल्यानंतरही लोकं लक्ष देत नाहीत आणि अपघाताला आमंत्रण देतात. आम्ही तुम्हाला अशा रस्त्याबद्दल सांगणार आहोत, जिथे गाडी नाही तर खुद्द रस्ताच हॉर्न वाजवतो. हे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी चांगलच आहे. यामुळे रस्त्यावर होणाऱ्या अपघातांवरही नियंत्रण मिळतं.

इथे आहे सुविधा

घाटात होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हिंदुस्तान पेट्रेलियम आणि लिओ बर्नेटने २०१७ रोजी एक खास आयडीया लॉंच केली होती. यामध्ये गाडीचा हॉर्न वाजण्याऐवजी रस्त्यावर हॉर्न वाजण्याची सिस्टम डेव्हलप केली आहे. या तंत्रज्ञानाची तपासणी करण्यासाठी सर्वात आधी जम्मू आणि श्रीनगरला जोडणाऱ्या एनएच-१ वर ही सिस्टम सुरु केली.

नक्की वाचा – ‘हा’ आहे जगातील सर्वात लांबचा विमान प्रवास, भारतातील या ठिकाणाच्या नावाचाही समावेश

ही सिस्टम यशस्वीपणे सुरु झाली

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनएच-१ वर ही सिस्टम यशस्वी झाली. अशाप्रकारची सिस्टम सुरु झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी झाले. ही सिस्टम देशातील दुसऱ्या ठिकाणच्या रस्त्यांवर लावण्याची योजना असल्याची माहिती आहे. एका रिपोर्टनुसार, स्मार्ट पोल लावल्यामुळं एनएच-१ वर अपघातांचं प्रमाण खूप कमी झालं आहे.

रस्त्यावर आपोआप वाजतो हॉर्न

घाटातील रस्त्यांवर नागमोडी वळणे असतात. यामुळे गाडी फिरवताना समोरून आलेली कार दिसत नाही. तर काही वेळेला चालक अशा ठिकाणी हॉर्न वाजवायला विसरून जातो. अशा परिस्थितीत अपघाता होण्याची शक्यता असते. या अपघातांच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी रस्त्यांवर स्मार्ट लाईफ पोल्स लावण्यात आले आहेत. गाडी या पोल्सजवळ पोहोचल्यावर रस्त्यावर हॉर्न वाजतो. ज्यामुळे चालकाला सावधानतेचा इशारा मिळण्यास मदत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(बातमीत दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता हे सत्य असल्याचा दावा करत नाही.)