मोठी ऑफर, ८ जीबी रॅम, जबरदस्त कॅमेरा आणि १५,००० रुपयांची सूट, Realme, Motorola चे ‘हे’ फोन चर्चेत

फेस्‍टिवल ऑफर संपल्यानंतर तुम्हाला स्‍मार्टफोन घेण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही चांगली ऑफर आहे. रियलमीचा 8 जीबी रॅमचा स्‍मार्टफोन तुम्हाला 15,000 रुपयांहून अधिकच्या डिस्‍काउंटसह खरेदी करता येईल.

फेस्‍टिवल ऑफर संपल्यानंतर तुम्हाला स्‍मार्टफोन घेण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही चांगली ऑफर आहे. रियलमीचा ८ जीबी रॅमचा स्‍मार्टफोन तुम्हाला १५,००० रुपयांहून अधिकच्या डिस्‍काउंटसह खरेदी करता येईल. दुसरीकडे मोटोरोचा EdgeX हा फोनही जबरदस्त आहे. असं असलं तरी कंपनीकडून या फोनचे अधिक तपशील जाहीर करणं बाकी आहे. मात्र, हा फोन 108MP कॅमेरासोबत भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.

Realme GT NEO 2

रियलमीच्या या नव्या लाँचिंग फोनमध्ये 8 GB RAM व 128 GB स्‍टोरेज देण्यात आलंय. या फोनची डिस्‍प्‍ले साईज 16.81 cm किंवा 6.62 inch Full HD+ असेल. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा 64MP + 8MP + 2MP आहे. फ्रंट कॅमेरा 16MP चा आहे. फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी असल्यानं चांगला बॅटरी बॅकअप मिळेल. हा फोन Qualcomm Snapdragon 870 वर चालतो.

15,000 पेक्षा अधिकची सूट

Realme GT NEO 2 वर १५,००० रुपयांपेक्षा अधिकची सूट देण्यात आलीय. ही सूट मिळवण्यासाठी तुम्हाला फ्लिपकार्टवर एक्‍सचेंज ऑफर सेक्‍शनमध्ये जाऊन फोन ऑर्डर करावा लागेल. तेथे 8GB RAM व्हेरिएंटवर १५,००० रुपयांची भक्कम सूट देण्यात आलीय. याशिवाय तुम्ही एक्‍सिस बँकेचं डेबिट कार्डही वापरू शकता. तसं केल्यास ५ टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल.

मोटोरोलाचा फोन कसा असेल?

नुकतेच Motorola Edge 20 Pro आणि Motorola Edge 20 स्मार्टफोनचे लाँचिंग झालेय. मोटोरोला एज 20 प्रोची किंमत ३६,९९९ रुपयांपासून आहे. मोटोरोला एज 20 ची किंमत २९,९९९ रुपयांपासून सुरू होते. मोटोरोला एज 20 प्रोमध्ये 6.7 इंच फुल एचडी+ OLED डिस्प्ले 144hz स्क्रीन रिफ्रेश रेटची सुविधा आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 SoC वर चालतो. यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. यात रिअर कॅमेरा 108 एमपी आहे. याशिवाय 4,520mAh ची बॅटरी आहे. Motorola Edge X देखील असाच असू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big offer of15000 discount on realme 8gb ram smartphone motorola phone with high quality camera pbs

ताज्या बातम्या