अंडं आधी की कोंबडी? हा प्रश्न नेहमीच आपल्याला बुचकळ्यात टाकतो. कुणी म्हणतं अंडं तर कुणी म्हणतं कोंबडी. पण जर अंडं म्हटलं तर मग ते कुठून आलं कारण अंडं कोंबडीच देते आणि कोंबडी म्हटलं तर मग ती कुठून आली कारण कोंबडी अंड्यातूनच बाहेर येते. त्यामुळे या प्रश्नाचं या दोघांपैकी अचूक उत्तर कोणते ते आपल्याला सहज सांगता येणार नाही. त्यामुळे या प्रश्नाला जगातील सर्वात कठीण प्रश्न म्हटला तरी चालेल. तर याच प्रश्नाचं उत्तर अखेर सापडलं आहे. होय, शास्त्रज्ञांनी याचं उत्तर शोधून काढलं आहे.

अंडं आधी की कोंबडी यावर यूकेतील शेफील्ड आणि वारविक युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी शोध सुरू केला. अनेक वर्षांच्या शोधानंतर त्यांना याचं योग्य उत्तर सापडलं आहे. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार जगात अंड्याआधी कोंबडी आली होती. या उत्तराचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे. तसंच त्यांनी याचं एक खास कारणही सांगितले आहे.

( हे ही वाचा: Railway track: धावती ट्रेन “रूळाचे ट्रॅक” इतक्या सहजतेने कशी बदलते? दिवस असो वा रात्र कधीही चुक होत नाही; ‘हे’ आहे कारण)

संशोधनात असं स्पष्ट झालं की, अंड्याच्या कवचेत एक ओवोक्लाइडिन नावाचं प्रोटिन असतं. याशिवाय अंड्याचं कवच बनू शकत नाही. हे प्रोटिन फक्त कोंबडीच्या गर्भाशयात तयार होतं. जेव्हा कोंबडीच्या गर्भाशयातील प्रोटिनचा अंड्याच्या निर्मितीत वापर होतो, तेव्हाच अंडं बनू शकतं.त्यामुळे जगात अंड्याआधी कोंबडी आली हे पक्कं झालं आहे. जेव्हा कोंबडी आली तेव्हाच तिच्या गर्भाशयात ओवोक्लाइडिन बनलं आणि मग या प्रोटिनमुळे अंड्याची निर्मिती झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे संशोधन करणारे डॉ कोलिन फ्रीमॅन म्हणाले की, बऱ्याच वेळापासून लोक जगात अंडं आधी की कोंबडं या प्रश्नाचं उत्तर शोधत होते. यावर अनेकांची वेगवेगळी उत्तरे असायची. अखेर शास्त्रज्ञांना पुराव्यानिशी या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे. जगात आधी कोंबडी आली आणि त्यानंतर अंडं.