PuBG Full Form : पबजी गेमविषयी कुणाला माहिती नाही, असा क्वचितच कोणी असेल. पबजी हा अत्यंत लोकप्रिय आणि तरुणाईला वेड लावणारा गेम आहे. अनेक शाळकरी मुले आणि तरुण मंडळी पबजी या गेमच्या आहारी गेल्याच्या अनेक घटना तु्म्ही वाचल्या असतील. पबजीमुळे मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी अनेक पालकांकडून समोर आल्या होत्या. या पबजीमुळे अनेक मुलांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम झाला आहे. पबजी गेम कसा खेळला जातो, हे कदाचित तु्म्हाला माहिती असेल, पण या पबजीचा फूल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का? आज आपण त्याविषयी जाणून घेऊ या. PUBG चा फूल फॉर्म आपल्यापैकी काही लोकांनी पबजी गेम खेळला असेल तर काही लोकांनी नाव तरी ऐकले असेल, पण तुम्हाला पबजी गेमचा फूल फॉर्म माहिती आहे का? पबजीच्या फूल फॉर्ममध्येच या गेमचा सारांश लपलाय.पबजीला इंग्रजीत 'PUBG' असं लिहितात. PUBG चा फूल फॉर्म प्लेअर अननोन्स बॅटलग्राउंट (player unknown battleground) आहे. म्हणजेच एकमेकांना ओळखत नसलेली मंडळी एकमेकांबरोबर हा गेम खेळतात. हेही वाचा : Earthquake in Delhi : दिल्लीत भूकंपाचे धक्के वारंवार का जाणवतात? जाणून घ्या कारण…. पबजी गेम कसा खेळला जातो? पबजी गेममध्ये पॅराशूटने एका ठिकाणी उतरावे लागते. त्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेली शस्त्रे आणि संरक्षक कवच मिळवत समोर आलेल्या प्रतिस्पर्धांना ठार मारावं लागतं. शेवटपर्यंत जीवंत राहणे हे खेळाडूचे मुख्य उद्दिष्ट असते. जितके जास्त तुम्ही मॅचेस जिंकता, तितका तुम्हाला गेममध्ये फायदा होतो. स्मार्टफोनवर सहज खेळता येत असल्यामुळे पबजी गेम अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. याशिवाय हा गेम अतिशय रोमांचक असून खेळताना कमी डेटा खर्च होतो, त्यामुळे जास्तीत जास्त लोक याकडे आकर्षित होताना दिसून येतात. पण, त्याबरोबरच अनेक मुले पबजी गेमच्या आहारी गेल्यामुळे पालकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे, हेही तितकेच खरे आहे. पबजीमुळे अभ्यासात लक्ष नसणे, तासनतास पबजी खेळणे, पबजीच्या व्यसनामुळे तणाव वाढणे यांसारख्या मानसिक आजाराला निमंत्रण देणाऱ्या घटनासुद्धा समोर आलेल्या आहेत.