Why Pen Caps Have Holes: पेन म्हणजे अनेकांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग. बहुतेकांचा खिशाला पेन लावल्याशिवाय दिवसच सुरू होत नाही. शाळा असो वा कॉलेज किंवा ऑफिस, आपण सर्रास पेन वापरतो. पण, तुम्ही कधी पेनाच्या टोपणावर असलेलं लहानसं छिद्र बघितलं आहे का? नक्कीच बघितलं असणार… पण ते का असतं, हे माहीत आहे का? काही लोक याला पेनाचं डिझाइन समजत असतील. पण, असं असलं तरीदेखील यामागचं खरं कारण काही वेगळंच आहे. तुम्हाला माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला पेनाच्या टोपणाला लहानसं छिद्र का असतं, यामागील कारण सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया…

पेनाच्या टोपणाला छिद्र का असतं?

लेखन आणि वाचनासाठी वापरल्या जाणार्‍या पेनाचे टोपणदेखील खूप खास असते. पण, पेनाच्या टोपणाला छिद्र का असतं याच कारण म्हणजे, पेनाच्या टोपणावरील हा छिद्र हवेचा दाब नियंत्रित करते आणि त्याची शाई सुकण्यापासून रोखते. याशिवाय या छिद्रामुळे हवेच्या दाबाशिवाय पेन बंद करणे आणि उघडणे सोपे होते.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
Shocking video MP: Fraudsters Replace QR Codes Of Several Shopkeepers To Redirect Payment In Their Bank Accounts In Khajuraho
तुम्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा; फसवणुकीचा हा Video पाहून दुकानदारांच्या पायाखालची जमीन सरकेल
Jumped Deposit Scam
बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
loksatta kalachi ganit Sankranti Eclipse Zodiac
काळाचे गणित: संक्रांतीची तिथी?

(हे ही वाचा : भारतात पायात घालणाऱ्या स्लीपरला ‘हवाई चप्पल’ का म्हणतात? जाणून घ्या यामागील रंजक कथा )

बर्‍याचदा लोकांना असेही वाटते की, कव्हरमध्ये छिद्र आहे, जेणेकरून निबची शाई सुकू नये. पण, खरंतर पेनाच्या टोपणावरील छिद्रांमागील आणखी एक कारण सांगितले जाते. ते कारण म्हणजे माणसाच्या सुरक्षेच्या संबंधित आहे. पेन ही अशी गोष्ट आहे की, अनेकांना पेनाचे टोपण तोंडात टाकण्याची सवय असते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत जवळ-जवळ सगळेच लोक अशा गोष्टी करतात. एखाद्याने जर चुकून तोंडात टोपण टाकले आणि ते गिळले तर अडचण निर्माण होऊ शकते. अनेकांना पेनाचं टोपण चघळायला आवडते आणि असे केल्याने टोपण चुकून तुमच्या घशातदेखील जाऊ शकतं, जे अधिक धोकादायक आहे. अशा अपघातापासून लोकांना वाचवण्यासाठी पेन कंपन्या याला छिद्र करू लागले आहेत.

Story img Loader