Why Do Politicians Wear White Clothes?: भारतात प्रत्येक किलोमीटरवर भाषा, बोली आणि वेशभूषा बदलते. पण मात्र, एका गोष्टीत साम्य आहे आणि ते आपल्या नेत्यांचा पेहराव आहे. भारतात तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की नेते फक्त पांढऱ्या कपड्यातच दिसतात. देशाच्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात, ज्याला नेता बनायचे आहे किंवा नेता म्हणून दिसायचे आहे, तो पांढरा पायजमा कुर्ता घालतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का,भारतीय नेते फक्त पांढऱ्या कपड्यातच का दिसतात? चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर…

राजकारणी लोक पांढरे कपडेच का घालतात?

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींनी स्वदेशीचा नारा दिला तेव्हा लोकांनी विदेशी कपडे गोळा करून त्यांना आग लावली. यानंतर महात्मा गांधींनी भारतीय लोकांना चरख्यापासून बनवलेले खादीचे कापड घालण्याची प्रेरणा दिली. खरे तर गांधीजींनी याकडे स्वावलंबनाचे प्रतीक म्हणून पाहिले.आणि खादीचे कपडे बहुतेक पांढरे होते. हळूहळू ते नेत्यांचे कापड बनले. त्यानंतर राजकारण आणि समाजसेवा करणारे लोक शुद्ध पांढरे कपडे घालू लागले.

(हे ही वाचा: हॉटेल रुममधील Bedsheet नेहमी पांढऱ्या रंगाचीच का असते? या मागचं कारण काय? )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंपरेने पाहिले तर पांढरा रंग सत्य आणि अहिंसेचे प्रतीक आहे. तर कुर्ता, पायजमा, धोतर आणि टोपी हा भारतीय पारंपारिक पोशाख आहे. यासोबतच पांढरे कपडे घालण्यामागे आणखी काही कारणे आहेत. कारण हे रंग अतिशय आकर्षक दिसतात. त्यामुळे पांढरा रंग परिधान केल्याने साधेपणा येतो. यामुळेच भारतातील प्रत्येक नेते आणि बहुतांश समाजसेवक पांढरे कपडे घालतात.