Gold Mine Superstition Mountains: जगभरात अद्याप उलगडा न झालेल्या अनेक गोष्टी, ठिकाणे आहेत. मानवी स्वभावानुसार आपल्याला लहानपणापासूनच अशा गोष्टींविषयी भारी आकर्षण असते. अगदी भारतातील भुतांच्या कथांसाठी प्रसिद्ध असलेले किल्ले, महाल ते बर्मुडा ट्रँगल पर्यंत अनेक रहस्य मानवी अभ्यासाच्या बाहेर आहेत. असाच एक अंधश्रद्धेचा कळस (नाही नाही, हे विशेषण नाही, नाव आहे) सुद्धा सध्या चर्चेत आहे.युनाइटेड स्टेट्सच्या ऍरिझोनामधील सुपरस्टीशन डोंगर हे सोन्याची खाण म्हणून ओळखले जातात. पण एक समस्या अशी की, हा डोंगर शापित असल्याचे मानले जाते. आजवर या पर्वतांमध्ये गेलेली व्यक्ती परत आली नाही असेही म्हंटले जाते. नेमका काय आहे हा प्रकार चला पाहूया..
सोन्याच्या खाणीचा सुपरस्टीशन डोंगर कठे आहे? (Where Is Superstition Mountain)
अमेरिकन इतिहासातील सर्वात जुनी खाण आहे द लॉस्ट डचमॅन. ही खाण देशाच्या नैऋत्येस स्थित असल्याचे म्हटले जाते. यूएसएच्या ऍरिझोनामधील अंधश्रद्धा पर्वत हे सोन्याची खाण असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. अभ्यासक बायर्ड ग्रेंजर यांच्या माहितीनुसार, सुमारे ९,००० लोक दरवर्षी लॉस्ट डचमनची खाण शोधण्याचा प्रयत्न करतात.
संशोधकाचा मृत्यू आणि…
संशोधक अॅडॉल्फ रुथ १९३१ च्या उन्हाळ्यात या भागात संशोनासाठी गेल्या होत्या. सहा महिन्यांनंतर याच भागात त्यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्यांच्या कवटीत बंदुकीच्या गोळ्यांचे दोन छिद्र होते, यामुळे खाणीच्या इतिहासाविषयी कुतुहूल वाढू लागले . सरकारने आता या सुपरस्टीशन पर्वतांमध्ये खाणकाम बेकायदेशीर ठरवले आहे.
हे ही वाचा<< एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या पगाराचा आकडा ऐकून व्हाल थक्क; आमदारांना तर महिन्याला…
दरम्यान, ३० वर्षांपूर्वी या खजिन्याची माहिती एका मोहिमेद्वारे गोळा करण्यात आली होती आणि काही लोक सोन्याच्या शोधात टेकड्यांवरही गेले होते. खजिना सापडला नसला तरी तब्बल ३ वर्षांनी खाणीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या लोकांचे मृतदेह सापडले. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे एक गूढच आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हे लोक परिसरातील उष्णतेचे बळी ठरले असावे असा अंदाज आहे.