आपल्या घराच्या अंगणात पक्ष्यांची ये-जा सुरू असते. कधी कावळा येतो, कधी चिमण्या येतात, कधी पोपट, तर कधी कबुतरे, तर कधी कोकिळा. कधी कधी न पाहिलेला असा वेगळा पक्षी दिसतो. पक्ष्यांना पाहिल्यानंतर तुमच्या मनात कधी असा प्रश्न आला आहे का की, पक्ष्यांचे आयुष्य किती असेल? म्हातारपणी पक्ष्यांचेही पिसे पांढरी होतात का? याच प्रश्नांची उत्तरे या लेखातून जाणून घेऊ या….

पक्षी किती काळ जगू शकतात? जीवन-मृत्यू हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे मानवाप्रमाणे प्राणी-पक्षी यांचे देखील आयुर्मान असते. पक्षी त्यांचे आयुष्य जलद गतीने जगतात. याचा अर्थ असा नाही की, ते तरुण अवस्थेतच मरतात. ते समान आकाराच्या सस्तन प्राण्यांच्या दुप्पट दराने ऊर्जा वापरतात. त्यामुळे हानिकारक बायोकेमिकल उप-उत्पादनांच्या जलद संचयनामुळे पक्षी सैद्धांतिकदृष्ट्या (Theoretically) अधिक लवकर वयात येतात.

असे असले तरीही लोक हे लक्षात घेत नाहीत की, पक्षी हे साधारण त्यांच्या वयोमर्यादेपेक्षा तिप्पट जगतात. तसेच त्यांच्यामध्ये वृद्धत्वाची तशी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

हेही वाचा – जगातील सर्वात लांब चोच असणारा पक्षी कोणता माहितीय का? जाणून घ्या….

पक्षी किती काळ जगतात?
नियमितपणे बंदिवासात असलेले मोठ्या आकाराचे पोपट साधारणपणे ६० वर्षांपेक्षा जास्त काळ जगतात. एकेकाळी विन्स्टन चर्चिलच्या मालकीच्या मॅकॉने (पोपटाने) वयाचे शतक (१०० वर्षे) पूर्ण केले होते. नोंदविल्या गेलेल्या माहितीनुसार, विस्डम नावाचा लेसन अल्बाट्रॉस (Laysan albatross) हा सर्वांत वयस्क वन्य पक्षी आहे; जो अजूनही ७२ व्या वर्षी तंदरुस्त आहे आणि २०२० मध्ये तो अंडी उबविताना दिसला होता.

अगदी पाच ग्रॅम वजनाचा एक छोटासा हमिंगबर्ड (Hummingbird) १४ वर्षे जगू शकतो. बागेतील पक्ष्यांमध्ये चिमण्या १८ वर्षे, ब्लॅकबर्ड्स २० वर्षे आणि गोल्डफिंच्स (goldfinches) २७ वर्षांपर्यंत जगू शकतात. पण, त्यापैकी बहुतेक पक्ष्यांची भक्षकाद्वारे वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच शिकार केली जाते आणि जवळजवळ निम्मे पक्षी वयाच्या पहिल्या वर्षी मृत पावतात.

हेही वाचा – तुम्ही बदकांना ब्रेड खायला घालू शकता का? बदकांना काय खायला द्यावे, काय नाही?

दुसरीकडे काही जपानी लहान पक्षी तीन वर्षांपेक्षा जास्त जगतात. हे काही प्रमाणात त्यांच्या तीव्र पुनरुत्पादकमुळे असू शकते. दोन महिन्यांत लैंगिक परिपक्वता गाठल्यानंतर, ते वर्षातून दोन किंवा तीन वेळा १० अंडी देतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हातारपणी पक्ष्यांची पिसे पांढरी होतात का?
सस्तन प्राण्यांमध्ये जेव्हा पिसांची मुळे रंगद्रव्ये निर्माण करणे थांबवतात तेव्हा ते पांढरे होऊ लागतात. खरे तर जॅकडॉ (कावळ्याची एक जात) आणि रॉबिन्ससह बरेच पक्षी असे आहेत; ज्यांचे पिसे पांढरे होऊ शकतात. परंतु, सस्तन प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांमध्ये पिसे पांढरे होण्याचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट दिसते. कारण- पक्ष्यांच्या पिसांतील रंग हे बहुतेक वेळा पिसांच्या सूक्ष्म रचनेमुळे तयार होतात; जे रंगद्रव्यांऐवजी वेगवेगळ्या तरंगलांबींवर (wavelengths) प्रकाश प्रतिबिंबित करतात.