Who Owns Zudio: Zudio या ब्रँडची चर्चा आज देशभरात आहे. इतर महागड्या ब्रॅण्डच्या तुलनेत स्वस्त आणि अत्यंत उत्तम गुणवत्तेचे कपडे मिळण्याचे ठिकाण म्हणजे झुडियो. बरं फक्त कपडेच नाहीत तर शूज, हिल्स, ऍक्सेसरीज असं सगळं काही एकाच ठिकाणी खरेदी करण्यासाठी झुडियो परफेक्ट आहे असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. अगदी कॉलेजच्या तरुणांपासून ते मध्यवयीन व वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकांना या ब्रँडच्या कपड्यांची भुरळ पडली आहे पण नेमकं या झुडियोचं बिझनेस गणित आहे तरी काय? इतर ब्रँड जे हेच किंवा याहून कमी दर्जाचे कपडे अव्वाच्या सव्वा रकमेत विकतात ते झुडियो इतक्या स्वस्त किमतीत कसं काय देऊ शकतं? आज याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झुडियोचे मालक कोण?

झुडियोच्या किमंतीविषयी बोलण्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ‘याचा मालक कोण आहे बाबा?’ खरंतर याचं उत्तर ऐकूनच तुमचं या ब्रँडवरचं प्रेम व विश्वास थोडा वाढण्याची शक्यता आहे. झुडियो हे ट्रेंट या ब्रँडचे उत्पादन आहे जी देशातील सर्वात जुन्या व मानाच्या टाटा ग्रुपची एक कंपनी आहे. ट्रेंटचे चेअरमन नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत.

झुडियो कसा सुरु झाला?

झुडियोची सुरुवात जरी २०१६ मध्ये बंगळुरू मधून झाली असली तरी त्याचा पाया हा १९९८ मध्ये रचण्यात आला होता. टाटा ग्रुपने आपल्या मालकीच्या Lakme या ब्रँडचा ५० टक्के शेअर १९९८ मध्ये २०० कोटीच्या व्यवहार करून हिंदुस्थान युनिलिव्हरला विकला. यातून आलेल्या पैशातून ट्रेंट या कंपनीची उभारणी झाली. ट्रेंट अंतर्गत वेस्टसाइड, स्टार व लँडमार्क या कंपनी सुद्धा आहेत. झुडियोचे सध्या देशातील ४२ शहरांमध्ये २९८ आउटलेट्स आहेत. ट्रेंट कंपनीच्या एकूण नफ्याचा १३ टक्के वाटा हा झुडियोचा आहे.

झुडियोचे कपडे एवढे स्वस्त का?

झुडियोची किंमत कमी असण्याचं कारण म्हणजे जाहिरातींवर फार खर्च न करता केवळ आपल्या कमी किंमत व जास्त गुणवत्ता या फीचरसह ब्रँड मार्केटिंग करतं. बहुधा हेच जाहिरातींवर खर्च न केलेले कोट्यवधी रुपये त्यांना ग्राहकांच्या फायद्यासाठी फिरवता येत असावेत. झुडियो २०१६ ला जेव्हा भारतात आलं तेव्हा मॉल मध्ये जाऊन ब्रँडेड कपडे खरेदी करण्याचा ट्रेंड आला होता याचाच विचार करून झुडियोने आपले प्रत्येक आउटलेट हे ब्रँड हाय क्लासला शोभेल अशा दर्जाचे बनवले. हि गुंतवणूक एकाच वेळी केलेली असली तरी त्याचा फायदा अद्यापही कंपनीला होत आहे.

हे ही वाचा<< iPhone मधील ‘i’ चा अर्थ काय? स्टीव्ह जॉब्स यांनी सांगितले खरे कारण, म्हणाले, “इंटरनेट नव्हे तर..”

तुम्हाला Zudio विषयी या गोष्टी माहित होत्या का? आणि तुम्हाला या ब्रँडचे कपडे आवडतात का हे कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How zudio sales branded clothes at cheapest rate because of smart business owner of zudio when was zudio started svs
First published on: 24-12-2022 at 10:24 IST