Indian Currency : आपण सर्वजण दररोज व्यवहार करताना ५०० रुपयांच्या नोटा वापरत असतो. मात्र, बाजारात अनेकदा ५०० रुपयांच्या नकली नोटा आढळल्याचे प्रकार देखील पाहायला मिळतात. याबाबत काही दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने इशारा देखील दिला होता. तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचंही सांगण्यात आलं होतं. दरम्यान, या पार्श्वभूमीवर तुमच्याकडे असलेली ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी हे कसं ओळखायचं? याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.

काय काळजी घेतली पाहिजे?

आपण बाजारात व्यवहार करताना अनेकदा ५०० रुपयांची नोट घाईगडबडीत घेतो. त्यामुळे नोट खरी आहे की खोटी हे आपल्या लवकर लक्षात येत नाही. मात्र, ५०० रुपयांची नोट घेताना तपासून घेतली पाहिजे. तसेच ५०० रुपयांच्या एखाद्या नोटेबद्दल तुम्हाला काही शंका आल्यास तुम्ही बँकेत जाऊन देखील तपासून घेऊ शकता.

नोट खरी की खोटी कसं ओळखायचं?

आरबीआयनुसार, ५०० रुपयांच्या नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते. तसेच नोटेच्या मागच्या बाजूला लाल किल्ल्याचे आकृतिबंध असतो. या बरोबरच ५०० रुपयांच्या नोटेचा अधिकृत आकार ६६ मिमी x १५० मिमी असतो. तसेच ५०० रुपयांच्या नोटेच्या मध्यभागी एक धागा असतो. त्यामध्ये भारत आणि RBI व ५०० ₹ ही अक्षरं छापलेली असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच ५०० रुपयांच्या नोटांवर एक धागा असतो. नोट तिरकी केल्यानंतर धाग्याचा रंग हिरवा आणि निळ्या रंगात दिसतो. तसेच नोटेवर उजव्या बाजूला देवनागरीत ५०० रुपये असं छापलेले असतं. या बरोबरच ५०० रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधींच्या फोटोचं वॉटरमार्क देखील दिसतं. तसेच ५०० रुपयांच्या खऱ्या नोटेवर इंग्रजीमध्ये ‘RESERVE BANK OF INDIA’ असं लिहिलेलं असतं.