Indian Railways Facts : भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे आहे. भारतीय रेल्वेच्या हजारो रेल्वे गाड्यांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे सर्वाधिक भारतीयांचे आर्थिक जीवन हे रेल्वेवर अवलंबून आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास हा काहीसा रंजक आहे. केवळ मालवाहतूकीच्या उद्देशाने सुरु झालेली ही भारतीय रेल्वे आज अनेकांची जीवनवाहिनी झाली आहे. भारतीय रेल्वेचे सुरुवातीचे नाव ‘ग्रेट पेनिन्सुलर रेल्वे’ असे होते. यानंतर १९५१ मध्ये त्याचे नाव बदलून ‘भारतीय रेल्वे’ असे करण्यात आले. भारतीय रेल्वेकडे सुमारे १.६ लाख किमी रेल्वे मार्ग आहेत. यातील ७० हजार किमी पेक्षा जास्त उत्तर रेल्वेमध्ये, ६३ हजार किमी पेक्षा जास्त मध्य रेल्वेमध्ये, ९ हजार किमी पेक्षा जास्त पश्चिम रेल्वेमध्ये आणि ४ हजार किमी पेक्षा जास्त दक्षिण रेल्वेमध्ये आहेत.

रेल्वे चालवण्यासाठी वापरले जायचे घोडे

भारतीय रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात रेल्वे गाड्या चालवण्यासाठी पूर्वी घोडे वापरले जायचे. ९ मे १८७४ रोजी हावडामध्ये पहिल्यांदा घोड्यावर धावणारी रेल्वे गाडी सुरु झाली. पण नंतर या गाड्यांसाठी वीज, डिझेल, इलेक्ट्रिसिटीचा वापर होऊ लागला, यामुळे त्यांचा वेग वाढला. त्यामुळे घोड्यावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या पूर्णत: हद्दपार झाल्या. सध्या भारतीय रेल्वे गाड्या ह्या विजेवर धावतात. भारतीय रेल्वेकडे सर्वात लांब ट्रेन कंटेनर रेल कार आहे जी १.५ किमी लांब आहे. याशिवाय जगातील सर्वात मोठे मरीन इंजिनही भारतीय रेल्वेकडे आहे ज्यातून ६ हजार हार्सपावरपर्यंत ऊर्जा निर्माण होऊ शकते. या रेल्वेची व्याप्ती जितकी मोठी आहे तितकीच कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. भारतीय रेल्वेत सध्या १.५ लाख कर्मचारी आहेत.

भारतीय रेल्वेचा ‘हा’ आहे सर्वात लांबचा मार्ग

भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जाणार्‍या रेल्वे गाड्यांचा समूह एका देशापेक्षा मोठा आहे. दररोज सुमारे २३ मिलियन प्रवासी यातून प्रवास करतात. भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जाणार्‍या ट्रेनपैकी डिब्रुगढ-कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस ही अशी एकमेव एक्सप्रेस आहे जी ४,२१८.९ किलोमीटरचे अंतर ७४ तास ३५ मिनिटांमध्ये पार करते. भारतातील जवळपास आठ राज्यांमधून ही ट्रेन जाते. अंतर आणि वेळ या दोन्ही बाबतीत हा भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग आहे, तसेच जगातील २४ वी सर्वात लांब रेल्वे सेवा आहे. ट्रेनच्या संपूर्ण मार्गावर ५८ थांबे आहेत.

भारतीय रेल्वेच्या राजधानी, शताब्दी रेल्वेचे तिकीट विमानापेक्षा महाग

भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसच्या तिकीटांची तुलना ही विमान तिकीटांसोबत केली जाते. या ट्रेनचे तिकीटापेक्षा विमान तिकीट स्वस्त असल्याचे म्हटले जाते. भारतीय रेल्वेद्वारे धावणारी साउथ स्पेशल ट्रेन दररोज सुमारे ७०० लाख रुपयांची वीज वापरते. भारतीय रेल्वेकडे जगातील सर्वात मोठी ब्रेक डाउन क्रेन आहे ज्याचे वजन १४० टन आहे. ही क्रेन जगातील कोणत्याही ठिकाणी स्थापित होऊन ट्रेन उचलण्यास सक्षम आहे.