Indian Railway Booking: ट्रेनचा प्रवास हा सोपा आणि सोयीस्कर मानला जातो. आपल्यापैकी बरेचजण ट्रेनने प्रवास करतात. प्रत्येक वेळी आपण ट्रेनने प्रवास करतेवेळी तिकीट बुक करतो. त्या तिकिटावर आपल्याला अनेक असे छोटे छोटे कोड आढळतात ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते. CNF, RAC, WL, RSWL, PQWL, GNWL सह अनेक कोड प्रवाशांना गोंधळात टाकतात. जर तुम्हीही ट्रेनचा प्रवास करत असाल तर या तिकिटांवर असलेल्या रेल्वे कोडचा अर्थ जाणून घेणे महत्त्वाचे आहे. भारतीय रेल्वेद्वारे वापरण्यात येणारे काही कोड येथे आहेत जे प्रवाशांनी जाणून घेतले पाहिजे.

PNR

PNR म्हणजे प्रवाशाचे नाव रेकॉर्ड, हा १० अंकी क्रमांक तेव्हा तयार केला जातो जेव्हा एखादा प्रवाशी ऑनलाइन किंवा ऑफलाइनद्वारे ट्रेनचे तिकीट बुक करतो. मोठ्या प्रमाणात बुकिंगच्या बाबतीत, एका पीएनआर नंबरमध्ये सहा प्रवाशांचे तपशील असू शकतात.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

( हे ही वाचा: Telegram वर मेसेज शेड्युल करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या स्टेप्स)

WL

WL तिकीट असलेला प्रवासी वेटिंग लिस्ट (waiting list) यादीत असतो आणि अशा प्रवाशाला ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी नसते. ट्रेन सुटण्याच्या ३० मिनिटे आधी वेटिंग लिस्टमध्ये असलेले प्रवासी तिकीट रद्द करू शकतात. वेटिंग लिस्ट तिकीट कन्फर्म न झाल्यास ते आपोआप रद्द होते.

RSWL

प्रवाशांच्या तिकिटावर रोडसाइड स्टेशन वेटिंग लिस्ट (RSWL) तेव्हा लिहिले जाते जेव्हा एखादी सीट सुरुवातीच्या स्टेशनपासून रोडसाइड स्टेशन किंवा त्याच्या जवळपास असणाऱ्या स्टेशनांसाठी बुक केली जाते. या वेटिंग लिस्टमध्ये कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यताही खूपच कमी असते.

( हे ही वाचा: SBI YONO चा पासवर्ड आणि युजरनेम कसा सेट करायचा जाणून घ्या)

RQWL

एका इंटरमीडिएट स्टेशनवरून दुसर्‍या इंटरमीडिएट स्टेशनवर जाण्यासाठी तिकीट बुक केली असल्यास, आणि जर ते तिकीट सामान्य कोटा किंवा रिमोट लोकेशन कोटा किंवा पुल्ड कोट्या मध्ये येत नसल्यास ते तिकीट रिक्वेस्ट वेटिंग लिस्टमध्ये पाठवले जाते.

RAC

जर एखाद्या प्रवाशाला RAC तिकीट दिले असेल, तर चार्ट तयार होईपर्यंत, त्याचे तिकीट कन्फर्म होऊ शकते आणि त्याला सीट मिळू शकते. चार्ट तयार केल्यानंतरही तिकीट आरएसी राहिल्यास, प्रवाशाला अर्धी सीट दिली जाते. म्हणजेच आरएसी तिकीट असलेल्या दोन व्यक्तींना एक सीट दिली जाते.

( हे ही वाचा: YouTube Premium व्हिडीओ ऑफलाईन कसे सेव्ह करायचे जाणून घ्या)

CNF

अशा परिस्थितीत, प्रवाशाला प्रवासासाठी पूर्ण सीट मिळते, त्याला कन्फर्म तिकिटासाठीही बर्थची माहिती मिळू शकत नाही. कारण या श्रेणीसाठी सीटचे वाटप TTE द्वारे चार्ट तयार करून स्वतः केले जाते.

GNWL

कॉमन वेटिंग लिस्ट (GNWL), वेटिंग लिस्ट (WL) तिकिटे प्रवाशांनी त्यांचे कन्फर्म बुकिंग रद्द केल्यानंतर जारी केली आहेत. वेटिंग लिस्टचा हा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि यामध्ये सीट कन्फर्म होण्याची शक्यता जास्त असते.

( हे ही वाचा: रेल्वे स्थानक नावाच्या फलकावर का दर्शवली जाते ‘समुद्र सपाटीची उंची’? जाणून घ्या यामागचं शास्त्रीय कारण)

TQWL

TQWL म्हणजे तात्काळ कोटा. जेव्हा एखादा प्रवासी तत्काळ बुकिंग करतो तेव्हा त्याला प्रतीक्षा यादीत टाकले जाते. तेव्हा ही स्थिती TQWL म्हणून दाखविली जाते. हे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता कमी असते.

Story img Loader